FASTag Annual Pass Scam: सावधान! FASTag वार्षिक पासच्या नावाखाली नवा स्कॅम; केंद्र सरकारकडून महत्त्वाचा इशारा

'सवलतीच्या दरात FASTag वार्षिक पास' देण्याच्या नावाखाली सायबर गुन्हेगार लोकांची फसवणूक करत असल्याचे समोर आले आहे.

FASTag Annual Pass Scam: सावधान! FASTag वार्षिक पासच्या नावाखाली नवा स्कॅम; केंद्र सरकारकडून महत्त्वाचा इशारा

FASTag Annual Pass Scam: डिजिटल युगात फसवणुकीचे नवनवे प्रकार समोर येत असताना, आता हायवेवरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना लक्ष्य केले जात आहे. ‘सवलतीच्या दरात FASTag वार्षिक पास’ देण्याच्या नावाखाली सायबर गुन्हेगार लोकांची फसवणूक करत असल्याचे समोर आले आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला (NHAI) या घोटाळ्याचे पुरावे मिळाल्यानंतर, सरकारने सर्वसामान्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

कसा होतोय हा ‘डिस्काउंट’ घोटाळा?
सायबर गुन्हेगारांनी NHAI आणि IHMCL च्या अधिकृत नावाचा व लोगोचा वापर करून हुबेहूब दिसणाऱ्या बनावट वेबसाईट्स तयार केल्या आहेत. फेसबुक, इंस्टाग्राम आणि X (ट्विटर) सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आकर्षक जाहिराती दाखवून युजर्सना या बनावट लिंकवर क्लिक करण्यास प्रवृत्त केले जाते. एकदा का वापरकर्त्याने लिंक उघडली, की त्याच्याकडून वाहन क्रमांक, FASTag आयडी आणि बँकिंग तपशील मागवले जातात. वार्षिक पासच्या नावाखाली पैसे भरताच, ही रक्कम थेट स्कॅमर्सच्या खात्यात जमा होते आणि कोणताही वैध पास मिळत नाही.

गृह मंत्रालयाचा ‘I4C’ कडून सतर्कतेचा इशारा
गृह मंत्रालयाच्या सायबर सुरक्षा शाखेने (I4C) आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून या संदर्भात मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. स्वस्त रिचार्ज आणि सवलतीच्या आमिषाला बळी पडू नका, असे आवाहन त्यांनी केले आहे. गुगल सर्चमध्ये येणारा प्रत्येक पहिला निकाल अधिकृत असतोच असे नाही, त्यामुळे कोणत्याही असत्यापित लिंकवर आपला OTP किंवा बँकिंग माहिती शेअर करणे धोक्याचे ठरू शकते, असेही यात नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा – Bhandara News : पाचवीत शिकणाऱ्या मुलाची करामत, स्वत:च्याच अपहरणाचा बनाव रचला अन्…

घोटाळा टाळण्यासाठी काय करावे?
सरकारने या सायबर फसवणुकीपासून वाचण्यासाठी खालील उपाय सुचवले आहेत:
अधिकृत स्त्रोत: FASTag वार्षिक पाससाठी फक्त अधिकृत ‘राजमार्गयात्रा’ (Rajmargyatra) मोबाईल अॅप किंवा NHAI च्या अधिकृत वेबसाईटचाच वापर करा.
बँकिंग चॅनेल: विश्वसनीय बँकिंग पोर्टल्सवरूनच रिचार्ज किंवा पासची प्रक्रिया पूर्ण करा.
जाहिरातींपासून सावध: सोशल मीडियावर दिसणाऱ्या भरघोस सवलतीच्या जाहिरातींवर क्लिक करणे टाळा.
माहितीची गोपनीयता: तुमचा FASTag आयडी, वाहन नोंदणी क्रमांक किंवा बँकिंग तपशील अनोळखी व्यक्तींना देऊ नका.

जर तुम्ही अशा कोणत्याही सायबर फसवणुकीचे बळी ठरलात, तर विलंब न करता 1930 या क्रमांकावर कॉल करा किंवा www.cybercrime.gov.in या अधिकृत पोर्टलवर आपली तक्रार नोंदवा. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number