बोईसरमध्ये मोठी खळबळ! हॉस्पिटलसमोरच इसमाची हत्या; पोलीस तपास सुरू

पालघरच्या बोईसर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे.
Palghar Crime

पालघरच्या बोईसर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. ओसवाल एम्पायर परिसरातील शिवम अपार्टमेंटमधील एका दुकानासमोर एका इसमाची हत्या करण्यात आली आहे. साईलीला हॉस्पिटलसमोर ही घटना घडली असून, मृत व्यक्तीचे नाव विजय बेंद्रे (वय – 40 वर्षे) असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच बोईसर पोलीस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली असून, या घटनेचा तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती विजय बेंद्रे हे वेठबिगार म्हणून काम करत असल्याचे समोर आले आहे. तसेच, हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनास्थळी पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

हेही वाचा- Belapur ST Bus Accident : बेलापूरमध्ये एस टी बसचा भीषण अपघात! तीन रिक्षा आणि तीन कारला जोरदार धडक; 8 ते 9 जखमी

ही घटना हॉस्पिटलच्या आवारात झाल्यामुळे स्थानिकांच्या मनात भीतीचे वातावरण असून, सुरक्षेबाबत मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version