2 हजार किलोमीटर प्रवास करत येऊन वडिलांना संपवलं! ‘दृश्यम’सारखा प्लॅन.. पण ‘त्या’ एका गोष्टीमुळे सापडला गुन्हेगार

तपासाची चक्रे फिरवत पोलिसांनी घटनास्थळाचा 'डंप डेटा' तपासला असता मृतकाचा मुलगा शिवशंकर सहनी याचे नाव समोर आले.

2 हजार किलोमीटर प्रवास करत येऊन वडिलांना संपवलं! ‘दृश्यम’सारखा प्लॅन.. पण ‘त्या’ एका गोष्टीमुळे सापडला गुन्हेगार
Crime

Drishyam Style Crime: बिहारमधील समस्तीपूर येथील हलई पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या दरबा गावात ‘दृश्यम’ चित्रपटापासून प्रेरणा घेऊन रचलेला एक भयानक हत्येचा कट उघडकीस आला आहे. जमिनीच्या वादातून मुलानेच आपल्या वृद्ध वडिलांची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या केली आणि पोलिसांना गुमराह करण्यासाठी 2,000 किलोमीटर दूर सुरतमध्ये असल्याचा भास निर्माण केला. 27 जुलै 2026 रोजी घराबाहेर झोपलेले शेतकरी रघुवीर साहनी यांचा अज्ञात हल्लेखोराने केलेला हल्ला जागीच जीवघेणा ठरला. सुरुवातीला या प्रकरणाचे गूढ वाढले होते, मात्र समस्तीपूर एसपींच्या सूचनेनुसार पटोरी एसडीपीओंच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना करून चौकशी वेगाने सुरू करण्यात आली.

डंप डेटा अन् पत्नीला केलेल्या कॉलने उलगडले गूढ
तपासाची चक्रे फिरवत पोलिसांनी घटनास्थळाचा ‘डंप डेटा’ तपासला असता मृतकाचा मुलगा शिवशंकर सहनी याचे नाव समोर आले. मात्र, शिवशंकर हा गुजरातमधील सुरत येथे नोकरी करत असून घटनेच्या वेळी तो तेथेच होता, असा दावा कुटुंबीयांनी व गावकऱ्यांनी केला. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपीने आपला मोबाईल फोन सुरतमध्येच बंद करून ठेवला होता, जेणेकरून सर्व्हिलन्स लोकेशन गुजरातचीच दिसेल. परंतु, मोबाईल बंद करण्यापूर्वी त्याने आपल्या पत्नीशी साधलेला संवादच या प्रकरणाचा मुख्य दुवा ठरला. तांत्रिक विश्लेषण आणि टॉवर लोकेशनच्या तपासणीत शिवशंकरच्या दाव्यांमधील फोलपणा स्पष्ट झाला आणि तपासाला नवी दिशा मिळाली.

हेही वाचा – आईसोबत मामाच्या गावी गेला अन् घरातल्यांसोबत तरुणाने…; 5 वर्षीय चिमुकलीला सोडलं नाही; अख्खं गाव हादरलं

रात्रीच्या अंधारात पायी प्रवास अन् कुऱ्हाडीने वार
संशयाची सुई फिरल्यानंतर पोलिसांनी सुरत गाठून शिवशंकरला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने संपूर्ण कट कबूल केला. चौकशीदरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी रेल्वेने पटोरी स्टेशनवर उतरला आणि ओळख पटू नये म्हणून रात्रीच्या अंधारात अनेक किलोमीटर पायी चालत गावाकडे गेला. घराच्या मागील दरवाजातून आत शिरून तेथीलच कुऱ्हाड घेऊन त्याने झोपलेल्या वडिलांवर वार केले. हत्येनंतर ती कुऱ्हाड तिथेच टाकून तो पुन्हा पायी पटोरी स्टेशनवर पोहोचला आणि पाटणामागून ट्रेन पकडून सुरतमध्ये परत गेला.

जमिनीचा वाद अन् ‘दृश्यम’ चित्रपटाची प्रेरणा
शिवशंकरला आपल्या नावावरील काही शेतजमीन विकायची होती, परंतु वडील रघुवीर साहनी यांचा त्याला तीव्र विरोध होता. यावरून घरात सातत्याने होणाऱ्या तीव्र वादांमधूनच मुलाने वडिलांचा काटा काढण्याचा कट रचला. पोलिसांना चकवा देण्यासाठी त्याने ‘दृश्यम’ चित्रपटातील कल्पनेप्रमाणे संपूर्ण स्क्रिप्ट तयार केली होती. मात्र, तांत्रिक पुरावे आणि एका चुकीच्या फोन कॉलमुळे त्याची हुशारी निष्फळ ठरली आणि तो गजाआड झाला.

हेही वाचा – कॉल लागत नसल्याने घरच्यांच्यासह पोलिसांची थेट हॉटेलमध्ये धडक, लेकीची डेडबॉडी पाहून सगळेच हादरले

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number