Abhimanyu Singh : अभिमन्यू सिंह यांच्या घरावर दरोडा; तब्बल एक कोटी 37 लाख रुपये लंपास, पोलिसांनी आरोपीला केली अटक

बॉलिवूड अभिनेता अभिमन्यू सिंह यांच्या अंधेरीतील घरावर झालेल्या हाय-प्रोफाईल दरोड्याचा मुंबई पोलिसांनी उलगडा केला आहे.

Abhimanyu Singh : अभिमन्यू सिंह यांच्या घरावर दरोडा; तब्बल एक कोटी 37 लाख रुपये लंपास, पोलिसांनी आरोपीला केली अटक

मुंबई: बॉलिवूड आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते अभिमन्यू सिंह यांच्या अंधेरीतील हाय-प्रोफाईल घरावर पडलेल्या दरोड्याने संपूर्ण चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली होती. मात्र, मुंबईच्या ओशिवरा पोलिसांनी अत्यंत कौशल्याने तपास करत या प्रकरणाचा सस्पेन्स संपवला आहे. विरार परिसरातून एका 40 वर्षीय सराईत गुन्हेगाराला बेड्या ठोकण्यात आल्या असून, त्याच्याकडून चोरीला गेलेला तब्बल एक कोटी 37 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

ही थरारक घटना 29 डिसेंबर 2025 च्या रात्री घडली. अंधेरी (पश्चिम) येथील लोखंडवाला परिसरातील 'मॅग्नम टॉवर' या आलिशान सोसायटीत अभिमन्यू सिंह यांचे घर आहे. मध्यरात्री जेव्हा अभिनेत्याची 82 वर्षीय वृद्ध आई आणि कुटुंबातील इतर सदस्य गाढ झोपेत होते, तेव्हा आरोपी मनोज मोहन राठोड याने बाथरुमच्या खिडकीतून घरात प्रवेश केला. कपाटातील सोन्या-हिऱ्यांचे दागिने आणि मोठी रोकड घेऊन त्याने कोणालाही थांगपत्ता लागू न देता पळ काढला. सकाळी हा प्रकार उघडकीस येताच परिसरात दहशतीचे वातावरण पसरले होते.

हेही वाचा: Madhav Gadgil Passes Away: निसर्ग जोपासण्याचा 'मंत्र' देणारा ऋषी हरपला! डॉ. माधव गाडगीळ यांच्या निधनाने पर्यावरण क्षेत्राची मोठी हानी

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण आणि त्यांच्या पथकाने तपास सुरू केला. मात्र, सुरुवातीला पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. अभिनेत्याच्या बंगल्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये 'नाईट व्हिजन'ची सुविधा नसल्याने आरोपीचे फुटेज अत्यंत अस्पष्ट होते. गुन्हे प्रकटीकरण पथकाने हार न मानता तांत्रिक कौशल्याचा वापर केला आणि परिसरातील इतर 50 हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले. अखेर एका पुसटशा सुगाव्यावरून तपासाची चक्रे विरारच्या दिशेने फिरली.

अखेर सराईत गुन्हेगार जाळ्यात पोलिसांनी विरार परिसरात सलग दोन दिवस सापळा रचला होता. अखेर मनोज मोहन राठोड (वय 40, रा. पालघर) याला ताब्यात घेण्यात आले. तपासात समोर आले की, मनोज हा कोणताही साधा चोर नसून एक सराईत घरफोड्या करणार चोर आहे. मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये त्याच्यावर चोरीचे किमान 14 गुन्हे दाखल आहेत. त्याने चोरी केलेले एक कोटी 37 लाख रुपये किमतीचे दागिने एका सोनाराकडे लपवून ठेवले होते, जे पोलिसांनी जप्त केले आहेत.

अनेक हिंदी चित्रपटांत दमदार भूमिका साकारणाऱ्या अभिमन्यू सिंह यांच्या घरातील ही चोरी पोलिसांसाठी प्रतिष्ठेचा विषय बनली होती. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ओशिवरा पोलिसांनी ज्या वेगाने आणि अचूकतेने आरोपीला बेड्या ठोकल्या, त्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. सध्या आरोपीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, या गुन्ह्यात त्याला कोणाची मदत मिळाली होती का, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा: Crime News : महाराष्ट्र ते झारखंड व्हाया बांगलादेश; निवडणुकीच्या तोंडावर बनावट नोटांच्या तस्करीचा पोलिसांकडून पर्दाफाश

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number