Vinesh Phogat On Brij Bhushan Sharan Singh: "अगदी सुरुवातीपासूनच संपूर्ण यंत्रणा…" बृजभूषण सिंह यांची निर्दोष सुटका, विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया

माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आल्यानंतर कुस्तीपटू आणि काँग्रेसच्या आमदार विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. 

Vinesh Phogat On Brij Bhushan Sharan Singh: &quotअगदी सुरुवातीपासूनच संपूर्ण यंत्रणा…&quot बृजभूषण सिंह यांची निर्दोष सुटका, विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया

दिल्लीच्या जंतरमंतरवर महिला कुस्तीपटूंनी केलेल्या आंदोलनादरम्यान  ‘रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया’चे (WFI) प्रमुख असताना बृजभूषण शरण सिंह यांनी लैंगिक छळ केल्याचे आरोप करण्यात आले होते. ‘रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया’चे प्रमुख असताना केलेल्या लैंगिक छळाबाबत सिंग यांच्यावर आरोप करणाऱ्या देशांतर्गत आणि परदेशातील महिला कुस्तीपटूंच्या तक्रारींच्या अनुषंगाने आरोपींवर खटला चालवला जात आहे.

दरम्यान महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळ प्रकरणात दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयाने भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर कुस्तीपटू आणि काँग्रेसच्या आमदार विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. 

हेही वाचा- Brij Bhushan Sharan Singh : महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळप्रकरणात बृजभूषण शरण सिंग यांना दिलासा; आरोपातून निर्दोष मुक्तता

विनेश फोगाट यांनी एक्स अकाउंटवर ट्वीट करत म्हटलं की, “सत्ताधारी पक्षाच्या एका शक्तिशाली नेत्याविरुद्ध रस्त्यावर उतरून एफआयआर दाखल करण्यासाठी आम्हाला खूप धाडस लागले. ब्रिजभूषणने आपल्या सत्तेचा आणि बाहुबलीचा वापर करून अनेक मुलींना धमकावून त्यांची नावे मागे घ्यायला लावली. पण अनेक महिला कुस्तीपटू न्यायालयात उभ्या राहिल्या आणि ब्रिजभूषणविरुद्ध लढल्या. महिला कुस्तीपटूंनी लावलेल्या लैंगिक अत्याचाराच्या आरोपांमध्ये न्यायालयाने ब्रिजभूषण शरण सिंगला दोषी ठरवले नाही, याचे आम्हाला खूप दुःख आहे. अगदी सुरुवातीपासूनच, संपूर्ण यंत्रणा, सरकार आणि संपूर्ण व्यवस्था ब्रिजभूषणचे संरक्षण करण्यासाठी काम करत आहे. महिला कुस्तीपटूंनी त्यांच्या वकिलांना या निर्णयाविरुद्ध अपील करण्याचे निर्देश दिले आहेत आणि हे शक्य तितक्या लवकर केले जाईल. आम्ही आशा सोडलेली नाही आणि कुस्तीपटू आपला लढा सुरूच ठेवतील.”

बृजभूषण शरण सिंह यांची निर्दोष मुक्तता होताच फटाके फोडून समर्थकांनी जल्लोष केला. यादरम्यान भाजपचे माजी खासदार आणि ‘रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया’चे माजी प्रमुख बृजभूषण शरण यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. “ज्या दिवशी माझ्यावर आरोप करण्यात आले होते, तेव्हाच मी म्हणालो होतो की जर आरोप सिद्ध झाले तर मी स्वतःहून फाशी घेईन, आज न्यायालयाने माझी निर्दोष मुक्तता केली आहे आणि ‘सन्मानपूर्वक मुक्तता’ असा शब्दप्रयोग केला आहे. जे झाले ते झाले,” अशी प्रतिक्रिया 69 वर्षीय भाजप नेत्याने निर्दोष मुक्ततेनंतर माध्यमांशी बोलताना दिली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number