FASTag Scam: सावधान! FASTag ‘वार्षिक पास’च्या नावाखाली मोठा ऑनलाइन घोटाळा; NHAI कडून वाहनधारकांना सतर्कतेचा इशारा

या घोटाळ्याचे गांभीर्य लक्षात घेऊन भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) एक अधिकृत सूचना (Advisory) जारी केली असून नागरिकांना बनावट वेबसाइट्सपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

FASTag Scam: सावधान! FASTag ‘वार्षिक पास’च्या नावाखाली मोठा ऑनलाइन घोटाळा; NHAI कडून वाहनधारकांना सतर्कतेचा इशारा

FASTag Scam: तुम्ही तुमच्या वाहनासाठी FASTag वापरत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. सध्या "वार्षिक पास" (Annual Passes) देण्याच्या बहाण्याने वाहनधारकांची ऑनलाइन फसवणूक केली जात असल्याचे समोर आले आहे. या घोटाळ्याचे गांभीर्य लक्षात घेऊन भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) एक अधिकृत सूचना (Advisory) जारी केली असून नागरिकांना बनावट वेबसाइट्सपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. चुकीच्या लिंकवर क्लिक केल्यास तुमच्या बँक खात्यातील रक्कम क्षणात लंपास होऊ शकते.

कसा होतोय हा नवा 'वार्षिक पास' घोटाळा?
सायबर गुन्हेगार सध्या FASTag वापरकर्त्यांना लक्ष्य करण्यासाठी नवनवीन क्लुप्त्या लढवत आहेत. यामध्ये प्रामुख्याने वापरकर्त्यांना स्वस्त दरात किंवा आकर्षक ऑफर्ससह 'वार्षिक पास' देण्याचे आमिष दाखवले जाते. हे प्रस्ताव पाहताना इतके खरे वाटतात की, सामान्य नागरिक सहज त्यांच्या जाळ्यात अडकतात. मात्र, प्रत्यक्षात अशा कोणत्याही अधिकृत सवलती उपलब्ध नसताना केवळ पैसे लुटण्यासाठी हे सापळे रचले जात आहेत.

गुगल सर्चमधील बनावट वेबसाइट्सचा धोका
या घोटाळ्यातील सर्वात चिंताजनक बाब म्हणजे, फसवणूक करणाऱ्यांनी अधिकृत वेबसाइट्ससारख्याच दिसणाऱ्या बनावट साइट्स तयार केल्या आहेत. SEO तंत्र आणि पेड जाहिरातींचा वापर करून या बनावट लिंक्स गुगल सर्चमध्ये सर्वात वर (Top Results) दिसतील अशी व्यवस्था केली जाते. यामुळे वापरकर्ते या साइट्सना अधिकृत प्लॅटफॉर्म समजून त्यावर क्लिक करतात आणि आपली संवेदनशील माहिती गुन्हेगारांच्या हाती सोपवतात.

तुमची वैयक्तिक माहिती आणि पैसे दोन्ही धोक्यात
एकदा का वापरकर्ता या बनावट वेबसाइटवर पोहोचला की, त्याला मोबाईल क्रमांक, वाहन नोंदणी क्रमांक आणि पेमेंटशी संबंधित गोपनीय माहिती देण्यास भाग पाडले जाते. पेमेंट केल्यानंतर वापरकर्त्याला कोणतेही वैध पुष्टीकरण (Confirmation) मिळत नाही. काही प्रकरणांमध्ये बनावट पावती दिली जाते, परंतु प्रत्यक्षात कोणतीही FASTag सेवा सक्रिय होत नाही. यामुळे वाहनधारकांचे आर्थिक नुकसान तर होतेच, शिवाय त्यांचा वैयक्तिक डेटाही असुरक्षित होतो.

हेही वाचा – Luggage Lost Helpline: रेल्वे प्रवासात बॅग हरवली आहे?; घाबरू नका! 'या' सोप्या ट्रिकने पुन्हा मिळवा तुमची बॅग

NHAI कडून सुरक्षिततेचे उपाय
भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राने (I4C) दिलेल्या माहितीनुसार, हे घोटाळे आता इतके प्रगत झाले आहेत की, पहिल्या नजरेत खरी आणि खोटी वेबसाइट ओळखणे कठीण झाले आहे. NHAI ने स्पष्ट केले आहे की, FASTag रिचार्ज किंवा इतर सेवांसाठी केवळ अधिकृत बँका, My FASTag App किंवा पडताळणी केलेल्या प्लॅटफॉर्मचाच वापर करावा. कोणत्याही अनोळखी लिंकवरून व्यवहार करणे टाळावे, अन्यथा ही एक चूक तुम्हाला महागात पडू शकते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number