Chhatrapati Sambhajinagar : खवड्या डोंगर प्रकरणाला चक्रावून टाकणारा अँगल! आदल्या रात्री आईची भावनिक पोस्ट, सोशल मीडियावर खळबळ

छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज परिसरातील खवड्या डोंगरावरून उडी घेऊन एकाच कुटुंबातील तिघांनी केलेल्या सामूहिक आत्महत्येच्या घटनेला आता एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर वळण मिळाले आहे.

Chhatrapati Sambhajinagar : खवड्या डोंगर प्रकरणाला चक्रावून टाकणारा अँगल! आदल्या रात्री आईची भावनिक पोस्ट, सोशल मीडियावर खळबळ

छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज परिसरातील खवड्या डोंगरावरून उडी घेऊन एकाच कुटुंबातील तिघांनी केलेल्या सामूहिक आत्महत्येच्या घटनेला आता एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर वळण मिळाले आहे. मृत मुलगा कुणालची आई संगीता चांदगुडे यांचे आत्महत्येपूर्वीचे काही व्हिडिओ समोर आले असून, या व्हिडीओंमध्ये त्यांनी पतीच्या नातेवाइकांमुळे आपला संसार उद्ध्वस्त झाल्याचा, सतत कौटुंबिक छळ सोसावा लागल्याचा आणि हक्काची संपत्ती लाटल्याचा थेट आरोप केला आहे.

हेही वाचा- Khawadya Dongar Tragedy: ‘माझ्या संसाराची राखरांगोळी केलीस…’; मृत कुणालच्या आईचा जुना व्हिडीओ व्हायरल

​समोर आलेल्या व्हिडिओमध्ये संगीता चांदगुडे अत्यंत उद्विग्न मनस्थितीत बोलताना दिसत आहेत. “माझ्या संसाराची राखरांगोळी केलीस, माझ्या मुलाला त्याच्या वडिलांपासून दूर केलेस, तू 7 पिढ्या हे पाप फेडशील, हा एका आईचा शब्द आहे.” अशा शब्दांत त्यांनी नणंद व नातेवाइकांवर कौटुंबिक छळ आणि संपत्ती हडपल्याचा थेट आरोप केला आहे. 

​यापूर्वी मोबाईलच्या हप्त्यावरून मुलाने राग धरल्याच्या अफवा पसरल्या होत्या. मात्र, आता संगीता यांचे हे व्हिडिओ समोर आल्यानंतर आत्महत्येमागे कौटुंबिक छळ, संपत्तीचा वाद आणि मानसिक त्रास होत. नव्या व्हिडिओ पुराव्यांच्या आधारे एमआयडीसी वाळूज पोलीस आता संबंधित नातेवाईकांची सखोल चौकशी करण्याची शक्यता आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number