Beed : परस्पर खोट्या तक्रारी? बीडमधील ‘त्या’ प्रकरणात पोलिसांचा मोठा खुलासा; कारवाईचा इशारा

मस्साजोग येथील धनंजय देशमुख यांनी समाधान खिंडकर व अन्य तिघांविरोधात जीवे मारण्याची धमकी आणि शस्त्राचा धाक दाखवल्याची तक्रार दिली होती. या प्रकरणात बीड ग्रामीण पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे.

Beed : परस्पर खोट्या तक्रारी? बीडमधील ‘त्या’ प्रकरणात पोलिसांचा मोठा खुलासा; कारवाईचा इशारा

बीड मधील दोन गटांमधील वादाच्या प्रकरणात बीड ग्रामीण पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. मस्साजोग येथील धनंजय पांडितराव देशमुख यांनी समाधान बाबुराव खिंडकर व अन्य तिघांविरोधात जीवे मारण्याची धमकी आणि शस्त्राचा धाक दाखवल्याची तक्रार दिली होती. तर दुसरीकडे समाधान बाबुराव खिंडकर यांनीही धनंजय देशमुख आणि त्यांच्या साथीदारांविरोधात पिस्तूल दाखवून धमकी दिल्याची फिर्याद दाखल केली होती. या दोन्ही तक्रारींवरून बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले होते. 

हेही वाचा- मोठी बातमी! धनंजय देशमुखांवर हत्येच्या प्रयत्नाचा गंभीर आरोप; नेमकं काय घडलं?

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन बीड ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. 30 मे रोजी रात्री 10 ते 12 वाजेदरम्यानचे फुटेज, प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब आणि इतर पुरावे तपासल्यानंतर फिर्यादींनी नमूद केलेली घटना घडल्याचे कोणतेही पुरावे आढळले नाहीत. तपासात धनंजय पांडितराव देशमुख आणि समाधान बाबुराव खिंडकर या दोन्ही तक्रारदारांनी जाणूनबुजून खोट्या तक्रारी दिल्याचे निष्पन्न झाले. याबाबतचा सविस्तर अहवाल न्यायालयात सादर करण्यात येणार असून संबंधितांविरोधात कायद्यानुसार पुढील कारवाईचे संकेत पोलिसांनी दिले आहेत. तसेच खोट्या तक्रारी देऊन पोलीस आणि न्यायव्यवस्थेचा गैरवापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही बीड पोलिसांनी दिला आहे.

नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, समाधान खिंडकर हे आपल्या काही मित्रांसह बीडमधील एका ढाब्यावर जेवणासाठी गेले होते. त्याच ठिकाणी धनंजय देशमुख आणि सोशल मीडियावर लोकप्रिय असलेले रील स्टार रविराज साबळे हे देखील उपस्थित होते. समाधान खिंडकर रविराज साबळे यांना मोबाईलमध्ये एक व्हिडिओ दाखवत असताना अचानक धनंजय देशमुख यांच्या अंगरक्षकाने त्यांचा मोबाईल हिसकावून घेतला. या प्रकाराबाबत विचारणा केल्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये वाद निर्माण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. वाद वाढल्यानंतर धनंजय देशमुख यांनी अंगरक्षकाकडील बंदूक हातात घेतली आणि ती त्यांच्या कानाला लावत धमकावले. तसेच जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचाही गंभीर आरोप त्यांनी केला आहे. या तक्रारीच्या आधारे बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात धनंजय देशमुख यांच्याविरोधात खुनाच्या प्रयत्नासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र आता ही तक्रार खोटी ठरली असून या घटनेनंतर सोशल मीडियावरही विविध प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number