Crime : आजोबांना ठार करुन अंत्यसंस्कारही उरकले! 17 वर्षीय नातीचा बॉयफ्रेंडसोबत मिळून कट; अखेर कपडे धुताना….

उत्तर प्रदेशातील झाशी जिल्ह्यात 65 वर्षीय रामदीन कुशवाह यांच्या अचानक झालेल्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणात रामदीन यांच्या अवघ्या 17 वर्षीय नातीसह तिच्या प्रियकराला अटल केली आहे.

Crime : आजोबांना ठार करुन अंत्यसंस्कारही उरकले! 17 वर्षीय नातीचा बॉयफ्रेंडसोबत मिळून कट; अखेर कपडे धुताना….

उत्तर प्रदेशातील झाशी जिल्ह्यात 65 वर्षीय रामदीन कुशवाह यांच्या अचानक झालेल्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणात रामदीन यांच्या अवघ्या 17 वर्षीय नातीसह तिच्या प्रियकराला अटल केली आहे. नेमकं काय घडलं त्याबाबत सविस्तर जाणून घ्या.

नेमकं घडलं काय?
मिळालेल्या माहितीनुसार, 12 सप्टेंबर रोजी सायंकाळी रामदीन यांची पत्नी कामावरुन घरी परतली. त्यावेळी रामदीन हे घरात नव्हते. त्यामुळे तिने नातीकडे आजोबांबाबत विचारणा केली असता, आपल्याला काहीच माहिती नाही असल्याचे तिने सांगितले. त्यानंतर रामदीन यांच्या कुटुंबीय आणि गावातील लोकांनी रात्रभर त्यांचा शोध घेतला.

हेही वाचा-Crime News : क्षुल्लक वादातून पत्नीला निर्घृणपणे संपवलं; चेहरा विद्रूप करून टोकाचं पाऊल उचलल्याचा बनाव… पण एक चूक अन् डाव पलटला

रात्रभर शोध घेऊनही रामदीन यांची कुठेच माहिती मिळाली नाही. मात्र, दुसऱ्या दिवशी नातीने आजोबा हे विहिरीच्या दिशेने जात असल्याचे घरातल्यांना सांगितले. त्यानंतर विहिरीत शोध घेतला असता रामदीन यांचा मृतदेह तिथं आढळून आला. त्यांच्या डोक्यावर काही दुखापतीच्या खुणाही होत्या. रामदीन यांना वारंवार दारु पिण्याची सवय असल्याने ते नशेत विहिरीत पडले असावेत, असे सर्वांचा अंदाज होता. त्यानंतर मृतदेह बाहेर काढन अंत्यसंस्कारही करण्यात आले.

अंत्यसंस्कारानंतर उलगडलं गूढ
अंत्यसंस्कारानंतर घराची साफसफाई आणि कपडे धूत असताना घरच्यांना नातीचे रक्ताचे डाग असलेले कपडे आढळऊन आले. याबाबत जेव्हा तिच्याकडे विचारणा केली. त्यानंतर कुटुंबीयांना रामदीन यांच्या मृत्यूबाबत शका आला आणि त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. 

हेही वाचा-Assam Crime: पत्नीचे डोके कापून फ्रिजमध्ये ठेवणाऱ्या आरोपीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांच्या गाडीतून घेऊन जाताना…

पोलिसांच्या माहितीनुसार, 17 वर्षीय नातीचे घराशेजारी राहत असलेल्या विशालसोबत संबंध होते. घटनेच्या दिवशी सुद्धा रामदीन यांनी दोघांना घरातील खाटेवर एकत्र पाहिले होते. त्यानंतर दोघांनी मिळून रामदीन यांची त्यांनी हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे, विशालने गळा आवळल्याचा, तर नातीने डोक्यावर वार केल्याचा पोलिसांचा दावा आहे. त्यानंतर दोघांनी आजोबांचा मृतदेह विहिरीत टाकला. सध्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून हत्येत वापरलेले हत्यारही जप्त केले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number