Nalasopara Crime Cake Shop: नालासोपाऱ्यात 11 जणांना गंभीर विषबाधा! केक खाताना जे दिसलं त्याने सगळ्यांचीच खळबळ उडाली; नेमकं काय घडलं?

नालासोपारा पूर्वेकडील निळकंठेश्वर इमारतीत वाढदिवसाचा केक खाल्ल्याने 11 जणांना गंभीर विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Nalasopara Crime Cake Shop: नालासोपाऱ्यात 11 जणांना गंभीर विषबाधा! केक खाताना जे दिसलं त्याने सगळ्यांचीच खळबळ उडाली; नेमकं काय घडलं?

नालासोपारा पूर्वेकडील निळकंठेश्वर इमारतीत वाढदिवसाचा केक खाल्ल्याने 11 जणांना गंभीर विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 15 ऑगस्टला एका तरुणीच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात हा केक खाण्यात आला होता. यामध्ये 7 अल्पवयीन मुलं आणि 4 महिलांचा समावेश होता. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान केकमध्ये मेलेली पाल असल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे.

हेही वाचा- UP Yogi Adityanath Action : महाराष्ट्रातील कारवाईचा देशभर डंका! मुंढेंच्या पावलावर पाऊल ठेवत योगी सरकारची ॲनालॉग डेअरी उत्पादनांवर कायदेशीर गदा

समोर आलेल्या माहितीनुसार, नालासोपारा येथील नीलकंठेश्वर बिल्डिंगमधून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मुलीच्या वाढदिवसानिमित्त चामुंडा डेअरी येथून खरेदी करण्यात आलेल्या केकला कापताच तो उपस्थित पाहूण्यांमध्ये वाटतण्यात आला. केक खाण्यास सुरुवात केली असता काही जणांची प्रकृती बिघडल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर केकची तपासणी करण्यात आली असता त्यामध्ये मृत पाल आढळल्याचा दावा करण्यात आला. दरम्यान हा केक खाऊन 7 ते 8 जणांना अस्वस्थ वाटू लागल्याची माहिती आहे.

या सर्वांना उपचारासाठी नालासोपारा येथील विजयलक्ष्मी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. रुग्णालयात दाखल झालेल्यांमध्ये उर्मिला वर्मा (32), सलोनी गुप्ता (16), सुदीक्षा शाह (19), आफिया इद्रिस (24), रुबी शाह (40), शिव गुप्ता (10), प्रियांश वर्मा (2), परी यादव (7), प्रिया वर्मा (8), रुद्र शाह (13) आणि प्राची यादव (8) यांचा समावेश आहे. सर्वांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number