Crime News: मॉडेल मुस्कान शर्माला मारण्यापूर्वी इम्रानचे ‘इन्स्टाग्राम लाईव्ह’; पोलिसांकडून महत्त्वाचा उलगडा

गेल्या काही महिन्यांपासून इम्रान अमली पदार्थांच्या तीव्र आहारी गेल्यामुळे त्याच्या वर्तनात अत्यंत हिंसक बदल झाले होते.

Crime News: मॉडेल मुस्कान शर्माला मारण्यापूर्वी इम्रानचे ‘इन्स्टाग्राम लाईव्ह’; पोलिसांकडून महत्त्वाचा उलगडा

Muskan Sharma Murder Case Delhi: दिल्लीतील टिळक नगर येथे 21 वर्षीय मॉडेल अन् कंटेंट क्रिएटर मुस्कान शर्मा हिच्या निर्घृण हत्येने संपूर्ण परिसर हादरला आहे. या प्रकरणात तपासादरम्यान एक अत्यंत धक्कादायक माहिती पुढे आली आहे. हत्येच्या अवघ्या एक तास आधी आरोपी इम्रानने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर लाईव्ह व्हिडिओ केला होता. या लाईव्हदरम्यान त्याने आधी स्वतः आत्महत्या करत असल्याचा बनाव रचत धमकी दिली आणि त्यानंतर मुस्कानला संपवण्याचे उघड संकेत दिले होते. पोलीस सध्या या व्हिडिओचे डिजिटल अन् तांत्रिक विश्लेषण करत आहेत.

जीममधील ओळखीनंतर अमली पदार्थांच्या व्यसनाने नात्यात तणाव
मुस्कान आणि इम्रान यांची 2024 मध्ये 'सेव्हन झोन' जीममध्ये भेट झाली होती, जिथे तो जीम ट्रेनर म्हणून कार्यरत होता. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून इम्रान अमली पदार्थांच्या तीव्र आहारी गेल्यामुळे त्याच्या वर्तनात अत्यंत हिंसक बदल झाले होते. इम्रानच्या छळाला कंटाळून 18 जुलै रोजी मुस्कानने पोलिसांत धाव घेतली होती; परंतु, औपचारिक तक्रार नोंदवली नव्हती. नंतर त्याला व्यसनमुक्ती केंद्रातही दाखल करण्यात आले होते.

हेही वाचा – Pune Crime : प्रियकरासोबत मौजमजा! नवऱ्याने बायकोला रंगेहाथ पकडलं, पण पतीलाच बेदम मारहाण, 18 हजारही लांबवले

घरात घुसून गळा आवळला अन् चाकूने सपासप वार केले  
26 ऑगस्ट रोजी संध्याकाळी सुमारे 5:40 वाजता जुन्या महावीर नगरमधील मुस्कानच्या घरात ती एकटी असल्याचे पाहून इम्रानने प्रवेश केला. त्यांच्यात जोरदार भांडण झाले. संतापाच्या भरात इम्रानने आधी तिचा गळा दाबला आणि नंतर पोटावर चाकूने प्राणघातक वार केले. हत्येनंतर तो तिचा मोबाईल घेऊन पसार झाला. संध्याकाळी 6:40 च्या सुमारास कामवाल्या बाईने रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मुस्कानला पाहिले आणि रुग्णालयात दाखल केले. तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

पोलीस अन् आरोपीत चकमक; पायात गोळ्या लागल्यानंतर इम्रानला अटक
घटनेनंतर पसार झालेल्या इम्रानचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी सुरू केली. रात्री 11:15 च्या सुमारास राजौरी गार्डन भागात तो पायी जाताना आढळला. पोलिसांनी त्याला आत्मसमर्पण करण्याचे आवाहन केले असता, त्याने पिस्तुल काढून पोलिसांच्या दिशेने 4 राऊंड फायरिंग केली. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात इम्रानच्या दोन्ही पायांत 3 गोळ्या लागल्या. जखमी इम्रानला गुरु गोविंद सिंग रुग्णालयात दाखल करून पोलिसांनी त्याला रीतसर अटक केली आहे.

हेही वाचा – Hingoli: खाकी वर्दीतच PSI ने उचललं टोकाचं पाऊल! धावत्या रेल्वेसमोर घेतली उडी; हिंगोलीत खळबळ

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number