Saturday, June 15, 2024 04:37:19 PM

Baba Ram Rahim
बाबा राम रहीम यांची निर्दोष सुटका

डेरा सच्चा सौदा प्रमुख बाबा गुरमीत राम रहीम यांची हत्येच्या एका प्रकरणात निर्दोष सुटका झाली आहे.

बाबा राम रहीम यांची निर्दोष सुटका

चंदिगड : डेरा सच्चा सौदा प्रमुख बाबा गुरमीत राम रहीम यांची हत्येच्या एका प्रकरणात निर्दोष सुटका झाली आहे. बाबा गुरमीत राम रहीम यांचे सहकारी रणजीत सिंह यांची हत्या झाली होती. ही हत्या १० जुलै २००२ रोजी झाली होती. हत्येच्या या प्रकरणात बाबा गुरमीत राम रहीम यांना दोषी ठरवून सीबीआयच्या विशेष न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने सीबीआयच्या विशेष न्यायालयाचा निर्णय फिरवला आहे. उच्च न्यायालयाने डेरा सच्चा सौदा प्रमुख बाबा गुरमीत राम रहीम यांची हत्येच्या प्रकरणात निर्दोष सुटका केली. हत्येच्या प्रकरात निर्दोष सुटका झाली तरी बाबा गुरमीत राम रहीम तुरुंगातच राहणार आहेत. पत्रकाराची हत्या आणि साध्वीवरील बलात्काराच्या प्रकरणात शिक्षा झाली असल्यामुळे डेरा सच्चा सौदा प्रमुख बाबा गुरमीत राम रहीम तुरुंगाबाहेर येणार नाही.


सम्बन्धित सामग्री