Crime News: पती-पत्नीमध्ये वाद; दुसऱ्या दिवशी तलावात आढळला आईसह 5 मुलांचा मृतदेह, संशयास्पद मृत्यूने खळबळ

भूतनाळ तलावात बुधवारी सकाळी एकाच कुटुंबातील 6 जणांचे मृतदेह तरंगताना आढळून आल्याने संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

Crime News: पती-पत्नीमध्ये वाद; दुसऱ्या दिवशी तलावात आढळला आईसह 5 मुलांचा मृतदेह, संशयास्पद मृत्यूने खळबळ

Crime News: उत्तर कर्नाटकातील विजयपुरा शहराच्या वेशीवर असलेल्या भूतनाळ तलावात बुधवारी सकाळी एकाच कुटुंबातील 6 जणांचे मृतदेह तरंगताना आढळून आल्याने संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. या दुर्दैवी दुर्घटनेत एका आईने आपल्या 5 लहान मुलांसह तलावात उडी घेऊन जीवन संपवल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मृतांमध्ये शोभा जलगेरी आणि तिची मुले – विद्या (14), सुवर्णा (14), गौदेश (10), विकास (5) आणि सानिका (7) यांचा समावेश आहे. हे दुर्दैवी कुटुंब विजयपुरा जिल्ह्यातील टिकोटा तालुक्यातील तोरवी गावचे रहिवासी होते.

सकाळी 8:45 च्या सुमारास उघडकीस आली घटना

विजयपुराचे पोलीस अधीक्षक (SP) लक्ष्मण निंबरगी यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी सुमारे 8:45 च्या सुमारास भूतनाळ तलावात 6 मृतदेह तरंगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढले आणि त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू केले. तपासात असे समोर आले की, 24 ऑगस्ट रोजी कौटुंबिक वादातून शोभा आपल्या मुलांसह घरातून निघून गेली होती. तिच्या पतीने म्हणजेच भीमराय यांनी विजयपुरा ग्रामीण पोलीस ठाण्यात सोमवारीच कुटुंब हरवल्याची तक्रार नोंदवली होती.

भांडणानंतर घर सोडले आणि शाळेतून दुसऱ्या मुलालाही सोबत घेतले

प्राथमिक तपासादरम्यान असे निष्पन्न झाले की, 'श्रावण सोमवार'च्या तयारीवरून शोभा आणि तिच्या पतीमध्ये तीव्र वाद झाला होता. या भांडणानंतर शोभाने जीवन संपवण्याची धमकी दिली आणि सकाळी 6:00 च्या सुमारास ती 4 मुलांना सोबत घेऊन घरातून बाहेर पडली. यानंतर ती एका निवासी शाळेत गेली, जिथे तिचा कर्णबधिर असलेला मुलगा शिकत होता. त्यालाही तिने सोबत घेतले. शोभाने आपला मोबाईल फोन घरीच ठेवला असल्यामुळे पोलिसांना तांत्रिक मदतीद्वारे त्यांचा शोध घेणे कठीण गेले.

हेही वाचा – Palghar Crime : सरकारी महिला अधिकाऱ्याची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी; 3 महिन्यांपूर्वी प्रियकराने भररस्त्यात केलेला कोयत्याने सपासप वार

पोलीस तपास आणि शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा

तलावावर पोलीस उपअधीक्षक नागराज आणि आदर्श नगर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी भेट देऊन सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत. वरकरणी हे आत्महत्येचे प्रकरण वाटत असले, तरी हा खरोखरच कौटुंबिक वादातून झालेला आत्मघाताचा प्रकार आहे की त्यामागे अन्य काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार असल्याचे पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number