Dowry Case: कर्नाटकचे राज्यपाल गेहलोत यांच्या कुटुंबात वाद; राज्यपालांच्या नातवावर पत्नीला 50 लाख रुपये हुंडा आणि छतावरून ढकलल्याचा आरोप

भाजप आमदार जितेंद्र गेहलोत यांचा मुलगा देवेंद्र गेहलोत याच्यावर त्याची पत्नी दिव्या गेहलोत हिने अत्यंत गंभीर आरोप केले आहेत.

Dowry Case: कर्नाटकचे राज्यपाल गेहलोत यांच्या कुटुंबात वाद; राज्यपालांच्या नातवावर पत्नीला 50 लाख रुपये हुंडा आणि छतावरून ढकलल्याचा आरोप

Dowry Case: कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्या कुटुंबातील कलह पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. राज्यपालांचे नातू आणि अलोट येथील भाजप आमदार जितेंद्र गेहलोत यांचा मुलगा देवेंद्र गेहलोत याच्यावर त्याची पत्नी दिव्या गेहलोत हिने अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. रतलाम जिल्ह्यातील सार्वजनिक सुनावणीत एसपीकडे केलेल्या अर्जात दिव्याने आपल्यावर घडलेल्या अत्याचारांचा विस्तृत उल्लेख केला आहे.

50 लाख रुपये हुंड्याची मागणी 

दिव्या गेहलोतचे म्हणणे आहे की 2018 मध्ये मुख्यमंत्री कन्यादान योजनेअंतर्गत ताल येथे तिचे आणि देवेंद्रचे लग्न झाले. काही दिवस सर्व काही सुरळीत चालले, पण काही महिन्यांतच तिच्यावर मानसिक व शारीरिक छळ सुरू झाल्याचा दावा तिने केला आहे. तिच्या म्हणण्यानुसार, देवेंद्र दारूच्या नशेत तिच्यावर वारंवार हल्ला करत असे. सासरच्या मंडळींकडून 50 लाख रुपये हुंडा आणण्याचा दबाव टाकला जात होता. 

हेही वाचा – Triple Talaq Case: हुंड्यात बुलेट न मिळाल्याचा संताप; लग्नाच्या 3 दिवसांत पतीकडून तिहेरी तलाक, पीडितेची पोलिसांत धाव

छतावरून ढकलून देऊन जीव घेण्याचा प्रयत्न?

दिव्याने 26 जानेवारीला घडलेली घटना सर्वात भयानक असल्याचे सांगितले. तिच्या आरोपानुसार, देवेंद्रने तिला नागदा येथील त्यांच्या घराच्या छतावरून ढकलून दिले. या हल्ल्यात तिचे हाड मोडले, तिला गंभीर दुखापती झाल्या. त्यानंतर तिला इंदूरमधील खाजगी रुग्णालयात दाखल करावे लागले. 

हेही वाचा – Nanded Crime News: 'तुला मोठं…' हत्येपूर्वी सक्षमने आचलला काय सांगितले? प्रियकराच्या वाढदिवशी घेतला महत्त्वाचा निर्णय

चार वर्षांच्या मुलीलाही भेटू दिलं नाही 

बरे झाल्यानंतर ती मुलीला भेटण्यासाठी घरी परतली, मात्र तिला तिच्या 4 वर्षांच्या मुलीला भेटू न दिल्याचंही पीडितेने नमूद केलं आहे. दिव्याने सांगितले की, सामाजिक कलंकाची भीती असल्याने मी बराच काळ शांत राहिले. पण आता माझ्या मुलीपासून मला दूर ठेवले जात असल्याने अत्याचाराविरोधात उभं राहणं भाग आहे. दिव्याने आज रतलाम पोलीस अधीक्षकांकडे औपचारिक तक्रार दाखल केली. पोलिसांनी प्राथमिक चौकशी केल्यानंतर हे प्रकरण उज्जैन जिल्ह्यातील असल्याने तक्रार उज्जैन पोलिसांकडे पाठवली असल्याची माहिती दिली. या प्रकरणातील अनेक गंभीर आरोपांमुळे कर्नाटक राज्यपालांच्या कुटुंबावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पुढील तपासानंतरच संपूर्ण सत्य समोर येईल.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number