Crime News: चिडून माहेरी गेली, 10 मिनिटांत परतली, घरातले CCTV बंद केले अन्…; पत्नीने कुटुंबाच्या मदतीने रचला पतीच्या हत्येचा थरारक कट

विनय गुप्ता असे मृत तरुण अभियंत्याचे नाव असून, ते एका नामांकित आयटी (IT) कंपनीत कार्यरत होते आणि त्यांचे वार्षिक उत्पन्न सुमारे 60 लाख रुपये होते.<br/>

Crime News: चिडून माहेरी गेली, 10 मिनिटांत परतली, घरातले CCTV बंद केले अन्…; पत्नीने कुटुंबाच्या मदतीने रचला पतीच्या हत्येचा थरारक कट

Crime News:  दिल्लीतील निहाल विहार परिसरात एक धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. अवघ्या चार महिन्यांच्या जुळ्या बाळांच्या औषधावरून झालेल्या कौटुंबिक वादात एका 31 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरला त्याच्या पत्नीने आणि तिच्या नातेवाईकांनी अमानुष मारहाण करून संपवलं. विनय गुप्ता असे मृत तरुण अभियंत्याचे नाव असून, ते एका नामांकित आयटी (IT) कंपनीत कार्यरत होते आणि त्यांचे वार्षिक उत्पन्न सुमारे 60 लाख रुपये होते.

मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मी पार्क येथे राहणाऱ्या विनय यांचा विवाह साडेतीन वर्षांपूर्वी बुध विहार येथील रेखा यांच्याशी झाला होता. शुक्रवारी एका बाळाला औषध देण्यावरून पती-पत्नीमध्ये किरकोळ शाब्दिक चकमक झाली. वादादरम्यान विनय यांनी थोडा मोठा आवाज केल्यामुळे रेखा संतापल्या आणि घर सोडून बाहेर पडल्या. कुटुंबीयांच्या आरोपानुसार, अवघ्या 10 मिनिटांत त्या आपल्या सासरच्या 6 नातेवाईकांना ज्यात त्यांचे दोन भाऊ, वडील, काका आणि वहिनी यांचा समावेश होता. विनय यांनी त्यांच्यासाठी पाहुणचार म्हणून पाणी आणले असता, आरोपींनी अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला.

सीसीटीव्ही बंद करून पूर्वनियोजित कट रचल्याचा आरोप

हल्लेखोरांनी विनय यांचा गळा आवळला आणि त्यांच्या छातीवर व शरीरावर हाता-पायांनी बेदम प्रहार केले. घरात उपस्थित असलेल्या विनय यांच्या वृद्ध आई-वडिलांनी मध्यस्थी करण्याचा आणि मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु आरोपींनी विनय यांना जीवोभावे मारहाण केली, ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. मृत अभियंत्याच्या कुटुंबीयांनी असा गंभीर आरोप केला आहे की, हा हल्ला पूर्णपणे पूर्वनियोजित होता. रेखा यांनी हल्ल्यापूर्वी घरातील सीसीटीव्ही कॅमेरे मुद्दाम बंद केले होते. तसेच, दोन्ही पती-पत्नी तिसऱ्या मजल्यावर वेगळे राहत होत्या आणि लहान-सहान गोष्टींवरून रेखा यांचे सासूशी वारंवार खटके उडत असत.

हेही वाचा – NEETची तयारी करणाऱ्या तरुणीचा बाथरूममध्ये रक्तबंबाळ मृतदेह; पाय बांधले, गळा चिरला अन् डोक्यावर गंभीर वार, नेमकं काय घडलं?

चार आरोपींना अटक; पोलिसांकडून तपास सुरू

या प्रकरणी तत्परतेने कारवाई करत पोलिसांनी रेखा आणि त्यांच्या दोन भावांसह एकूण चौघांना अटक केली आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 103(1) (हत्या) आणि कलम 3(5) (सामायिक उद्देश) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या प्रत्येकाची नेमकी भूमिका काय होती, सीसीटीव्ही खरोखरच जाणीवपूर्वक बंद केले गेले होते का आणि या हत्येमागे आधीपासूनच काही कट शिजत होता का, या सर्व बाजूंचा पोलिस गांभीर्याने तपास करत आहेत.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number