नवी दिल्ली: दिल्लीत एका बाबाने कांड केले आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. दक्षिण दिल्लीतील एका शिक्षण संस्थेशी संबंधित स्वामी चैतन्यानंद सरस्वती यांच्यावर विद्यार्थिनींच्या लैंगिक शोषणाचा आरोप आहे. हा बाबा चैतन्यानंद सरस्वती मोठा कांड करणारा आहे. त्याने अनेक मुलींचे लैंगिक शोषण केले आहे. रात्रीच्या वेळी तो आपल्या खाजगी कक्षात मुलींना बोलवत असे आणि परदेश दौऱ्यासाठी जबरदस्ती करत असे. एवढेच नाही तर, त्याने सुरक्षेच्या नावाखाली मुलींच्या वसतिगृहात गुप्त कॅमेरा बसवला होता. एफआयआरमध्ये चैतन्यानंद सरस्वतीच्या काळ्या कारनाम्याची नोंद झाली आहे. स्वामी चैतन्यानंदची ‘लेडी गँग’ नेमकं काय करायची चला जाणून घेऊया…
विद्यार्थिनींची छेड काढण्याच्या प्रकरणात चैतन्यानंद सरस्वतीबाबत मोठा गौप्यस्फोट झाला आहे. एफआयआरनुसार, आर्थिकदृष्ट्या कमकुवत गटातील विद्यार्थिनींना रात्री उशिरा स्वामी चैतन्यानंद सरस्वतीच्या क्वार्टरमध्ये बोलावले जात असे. मुलींच्या वसतिगृहात सुरक्षेच्या नावाखाली गुप्त कॅमेरे लावण्यात आले होते. तसेच एका विद्यार्थिनीचे नाव तिच्या इच्छेविरुद्ध बदलण्यास भाग पाडले गेले. एवढेच नव्हे, विद्यार्थिनींना परदेश दौरे आणि रात्री उशिरा चैतन्यानंद सरस्वतीच्या खाजगी कक्षात बोलावण्यासाठी जबरदस्ती केली जात असे.
हेही वाचा: Jalgaon Crime: अजित पवारांचा निकटवर्तीय विनोद देशमुख अटकेत, जळगावच्या राजकीय वर्तुळात खळबळ
प्रकरणात चैतन्यानंद सरस्वतीसोबत कर्मचाऱ्यांचाही सहभाग
एफआयआरनुसार, सहाय्यक डीनसह काही कर्मचारी सदस्य विद्यार्थिनींवर स्वामींच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी दबाव टाकत असे. तसेच विद्यार्थिनींच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले जात होते. ज्या मुलींनी विरोध केला, त्यांना धमकावून गप्प बसवले. विरोध करणाऱ्या विद्यार्थिनींना निलंबित करण्याची आणि कॉलेजमधून काढून टाकण्याची धमकी दिली जात होती. विद्यार्थिनींच्या पालकांना हस्तक्षेप करण्यापासून रोखले जात होते.
तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले की, स्वामी चैतन्यानंद सरस्वती आणि त्याच्या काही सहकाऱ्यांकडून महिला विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण करण्यात आले. व्हॉट्सअॅप आणि एसएमएसद्वारे विद्यार्थिनींना अश्लील संदेश पाठवले जात होते. संदेशांचा किंवा लैंगिक मागण्यांचा विरोध केल्यास विद्यार्थिनींना कॉलेजमधील पदवी अडकवून ठेवण्याची धमकी दिली जात होती तसेच कागदपत्रे न देण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या. या प्रकारामुळे महिला विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण आहे. या प्रकरणात विद्यार्थिनी वैयक्तिकरित्या समोर येण्यास घाबरत आहेत.