Crime News : अजब प्रेमाची गजब क्राइम स्टोरी; तो 21 वर्षांचा, तर ती 52 वर्षांची, लग्नाला नकार…आणि प्रेमाचा थरारक शेवट…

लग्नासाठी वारंवार तगादा लावल्याने संतापलेल्या एका 21 वर्षीय तरुणाने आपल्या 52 वर्षीय प्रेयसीला संपवलं.

Crime News : अजब प्रेमाची गजब क्राइम स्टोरी; तो 21 वर्षांचा, तर ती 52 वर्षांची, लग्नाला नकार…आणि प्रेमाचा थरारक शेवट…

Crime News:  तामिळनाडूच्या तिरुप्पुवनम येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लग्नासाठी वारंवार तगादा लावल्याने संतापलेल्या एका 21 वर्षीय तरुणाने आपल्या 52 वर्षीय प्रेयसीला संपवलं. या कृत्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने मृतदेह एका जड दगडाला बांधून 100 फूट खोल खाणीत फेकून दिला होता. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली आहे.

कामगार महिला 11 फेब्रुवारीपासून होती बेपत्ता
मृत महिलेची ओळख सरस्वती (वय 52) अशी पटली असून, ती सोट्टाथट्टी गावातील रहिवासी होती. सरस्वती मजुरीचे काम करत असे. 11 फेब्रुवारी रोजी ती नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी घरून बाहेर पडली, मात्र ती पुन्हा परतलीच नाही. तिच्या भावाने पोलीस ठाण्यात ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपासचक्र फिरवले. तपासादरम्यान सरस्वतीच्या 'कॉल रेकॉर्ड्स'वरून पोलिसांना कुडाक्कोविल येथील 21 वर्षीय सरवणकुमार याच्यावर संशय आला.

प्रेमसंबंध आणि लग्नाचा तगादा ठरला मृत्यूचे कारण
पोलिसांनी सरवणकुमारला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. सरस्वती आणि सरवणकुमार हे दोघेही एकाच बांधकाम साईटवर काम करत होते, जिथे त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. वयातील मोठा फरक असूनही सरस्वती सरवणकुमारकडे लग्नासाठी सतत आग्रह धरत होती. याच वादातून सरवणकुमारने तिचा काटा काढण्याचे ठरवले.

वनक्षेत्रात नेऊन संपवलं  
घटनेच्या दिवशी सरवणकुमारने सरस्वतीला दुचाकीवरून उलाकानीजवळील एका निर्जन वनक्षेत्रात नेले. तिथे लग्नाच्या विषयावरून पुन्हा कडाक्याचे भांडण झाले आणि रागाच्या भरात त्याने सरस्वतीवर जीवघेणा हल्ला केला. तिचा मृत्यू झाल्यानंतर त्याने मृतदेह एका मोठ्या दगडाला बांधला आणि जवळच असलेल्या एका खाणीतील पाण्यात फेकून दिला. पोलिसांनी पाणबुड्यांच्या मदतीने सुमारे 100 फूट खोल खाणीतून सरस्वतीचा मृतदेह बाहेर काढला.

हेही वाचा – Maharashtra Post Office Threat Call : सर्व पोस्ट ऑफिस बॉम्बने उडवण्याची धमकी, राज्यात सर्वत्र खळबळ

आरोपीला न्यायालयीन कोठडी
कुडाक्कोविल पोलिसांनी आरोपी सरवणकुमारला अटक करून न्यायालयासमोर हजर केले, जिथे त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेतील क्रूरता आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची पद्धत पाहून संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून संताप व्यक्त केला जात आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number