नापिकीचं संकट, दुष्काळाच्या झळा; शेतकऱ्याने उचललं टोकाचं पाऊल, उपचारासाठी नेताना वाटेतच मृत्यू

राज्यातील दुष्काळाची झळ अनेक शेतकऱ्यांना बसत असून त्यात छत्रपती संभाजीनगरमधून एक चिंताजनक बातमी समोर आली आहे.

नापिकीचं संकट, दुष्काळाच्या झळा; शेतकऱ्याने उचललं टोकाचं पाऊल, उपचारासाठी नेताना वाटेतच मृत्यू

राज्यातील दुष्काळाची झळ अनेक शेतकऱ्यांना बसत असून त्यात छत्रपती संभाजीनगरमधून एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात शेतकऱ्याने आपले जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना घडली.

चिंचोली लिंबाजी येथील 40 वर्षीय अल्पभूधारक शेतकरी भगवान दत्तू गाडेकर यांनी कर्जाच्या विवंचनेतून विषारी द्रव प्राशन केल्याची घटना घडली. तीन भावांकडे मिळून अवघी 66 आर शेती होती. शेतीसोबत रोजमजुरी करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते.

2024 आणि 2025 मधील अतिवृष्टी, यंदा पावसाअभावी निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती आणि शेतीतून खर्चही न निघाल्याने कुटुंब आर्थिक संकटात सापडलं होतं.

बचत गट, ग्रामीण कुटा फायनान्स आणि खासगी व्यक्तींकडून घेतलेलं कर्ज कसं फेडायचं, या विवंचनेतून त्यांनी गुरुवारी सायंकाळी विषारी द्रव प्राशन केलं. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना सिल्लोडजवळ त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

अशातच छत्रपती संभाजीनगरमधून अशा घटनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून ही अत्यंत दु:खद बाब आहे. बळीराजा हा देशाचा कणा असतो, मात्र तोच खचत चालल्याने मोठे संकट ओढवले आहे. कारण दुष्काळासह चारा टंचाई या समस्यांमुळे पशुधनातूनही पुरेसा रोजगार उपलब्ध होत नाहीये.

हेही वाचा – कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात महिला भाविकाला बेदम मारहाण! पुजाऱ्याच्या पत्नीवर आरोप, नेमकं काय घडलं?

महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number