Tuesday, November 11, 2025 08:26:06 PM

Hyderabad Crime News : जन्मदात्यानेच घेतला अडीच वर्षांच्या चिमुकल्याचा जीव; बेपत्ता झाल्याची खोटी तक्रार दाखल करत मृतदेह फेकला नदीत

अकबर पत्नी सना बेगम हिच्यासोबत वारंवार वाद घालत असे. मुलाच्या आजारासाठी तो पत्नीला जबाबदार धरत होता.

hyderabad crime news  जन्मदात्यानेच घेतला अडीच वर्षांच्या चिमुकल्याचा जीव बेपत्ता झाल्याची खोटी तक्रार दाखल करत मृतदेह फेकला नदीत

Hyderabad: हैदराबादमध्ये कौटुंबिक वादातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. प्राप्त माहितीनुसार, 35 वर्षीय मोहम्मद अकबर याने आपल्या अडीच वर्षांच्या मुलाचा मोहम्मद अनस याचा गळा दाबून खून केला. अकबर पत्नी सना बेगम हिच्यासोबत वारंवार वाद घालत असे. मुलाच्या आजारासाठी तो पत्नीला जबाबदार धरत होता. 12 सप्टेंबरच्या रात्री, जेव्हा सना कामावर गेली होती, तेव्हा अकबरने मुलाची हत्या केली. त्यानंतर मृतदेह पोत्यात भरून दुचाकीवर नेऊन नयापुलजवळील मुसी नदीत फेकून दिला.

हेही वाचा Jalgaon: 'माझ्याकडे पाहून का थुंकला', जळगावात दोन कुटुंबांमध्ये तुफान हाणामारी; एकाचा मृत्यू, 11 जण जखमी

घटनेनंतर पोलिसांना दिशाभूल करण्यासाठी अकबरने बेपत्ता झाल्याची खोटी तक्रार दाखल केली. मात्र, तपासादरम्यान पोलिसांनी त्याचे मोबाईल रेकॉर्ड आणि सीसीटीव्ही फुटेज तपासले असता संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. चौकशीत अकबरने गुन्ह्याची कबुली दिली.

हेही वाचा - Navi Mumbai Youth Viral Video : नवी मुंबईत हुल्लडबाज तरुणांचे जीवघेणे स्टंट

या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी अकबरला ताब्यात घेत गुन्हा नोंदवला आहे. दरम्यान, चिमुरड्याचा मृतदेह शोधण्यासाठी मुसी नदीत शोधमोहीम सुरू आहे.


सम्बन्धित सामग्री