CJP’s Protest In Mumbai : CJP च्या आंदोलनप्रकरणी मुंबई पोलिसांकडून आंदोलकांविरुद्ध गुन्हे; तर 900 हून अधिक आंदोलकांवर FIR दाखल

मुंबई : मुंबईतील CJPच्या आंदोलनानंतर मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई करत शहरातील विविध 8 पोलीस ठाण्यांत एकूण 8 गुन्हे दाखल केले आहेत. परवानगीशिवाय आंदोलन करणे आणि कायदा-सुव्यवस्थेचा भंग केल्याप्रकरणी 900 हून अधिक आंदोलकांविरोधात FIR दाखल करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वाधिक गुन्हे शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात दाखल झाले असून, तेथे 600 हून अधिक आंदोलकांविरोधात FIR नोंदवण्यात आली आहे. […]

CJP’s Protest In Mumbai : CJP च्या आंदोलनप्रकरणी मुंबई पोलिसांकडून आंदोलकांविरुद्ध गुन्हे; तर 900 हून अधिक आंदोलकांवर FIR दाखल

मुंबई : मुंबईतील CJPच्या आंदोलनानंतर मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई करत शहरातील विविध 8 पोलीस ठाण्यांत एकूण 8 गुन्हे दाखल केले आहेत. परवानगीशिवाय आंदोलन करणे आणि कायदा-सुव्यवस्थेचा भंग केल्याप्रकरणी 900 हून अधिक आंदोलकांविरोधात FIR दाखल करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वाधिक गुन्हे शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात दाखल झाले असून, तेथे 600 हून अधिक आंदोलकांविरोधात FIR नोंदवण्यात आली आहे. तसेच, माहिम पोलीस ठाण्यात 100 हून अधिक, दादर पोलीस ठाण्यात 70 हून अधिक आणि सायन पोलीस ठाण्यात 40 हून अधिक आंदोलकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याशिवाय, वरळी पोलीस ठाण्यात 21 जणांविरोधात, काळाचौकी पोलीस ठाण्यात 20 हून अधिक, भोईवाडा पोलीस ठाण्यात 20 हून अधिक तसेच वडाळा टीटी पोलीस ठाण्यात 25 हून अधिक जणांविरोधातही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी या प्रकरणांचा पुढील तपास सुरू केला असून, आंदोलनादरम्यान कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार, अशी माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे. 

हेही वाचा : PM Modi on CJP Protest : बाहेर कॉक्रोच पार्टीच आंदोलन आत खासदारांचं ‘मंगल मिलन’, मोदी म्हणाले; “आम्ही विद्यार्थ्यांसोबत”

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number