Thursday, February 19, 2026 09:19:01 AM

3 Sisters Jump to Death: कोरियन गेमच्या नादात 3 बहिणींचा जीव गेला, मध्यरात्री खिडकी उघडली अन् तिघींनी 9व्या मजल्यावरून उड्या मारल्या

पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, हस्तलिखित संदेश आणि गेमिंग अ‍ॅपच्या काही सहभाग आहे का याचा तपास सुरू आहे.

3 sisters jump to death कोरियन गेमच्या नादात 3 बहिणींचा जीव गेला मध्यरात्री खिडकी उघडली अन् तिघींनी 9व्या मजल्यावरून उड्या मारल्या

गाझियाबाद: टिला मोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भारत सिटी सोसायटीमधील (Tower B-1) नवव्या मजल्यावर राहणाऱ्या तीन अल्पवयीन बहिणींनी खिडकीतून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत निशिका (वय 16), प्राची (वय 14) आणि पाकी (वय 12) या तिन्ही बहिणींचा मृत्यू झाला आहे. घटनेनंतर संपूर्ण सोसायटीत भीतीचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तिन्ही बहिणी कोविड 19 महामारीनंतर शाळेत जात नव्हत्या. सर्वात मोठी बहिण निशिका ही चौथ्या वर्गात शिकत होती, अशी माहिती समोर आली आहे. ही घटना पहाटे सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तिन्ही बहिणींना लोणी येथील संयुक्त रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

शालीमार गार्डनचे सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) अतुल कुमार सिंह यांनी सांगितले की, ज्या खोलीत ही घटना घडली त्या खोलीत देवघर (Temple) होते आणि त्या खोलीची खिडकी उघडी होती. प्राथमिक तपासात तिन्ही बहिणींनी खुर्चीवर उभे राहून एकामागोमाग एक उडी मारल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा: Ajit Pawar Plane Crash: बारामती दुर्घटनेत नवा ट्विस्ट, दादांचं विमान कोसळण्याआधी एक जण उडी मारत होता पण...; प्रत्यक्षदर्शीची मिटकरींना माहिती

नेमकं काय घडलं, प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार

या घटनेच्या वेळी परिसरात उपस्थित असलेले अरुण सिंह त्या रात्री नेमके काय घडले, याचे थरकाप उडवणारे वर्णन केले आहे. अरुण सिंह यांच्या म्हणण्यानुसार, ही घटना रात्री सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास घडली. ते ऑफिसचे काम आटोपून झोपण्याच्या तयारीत असताना त्यांच्या नजरेस समोरच्या इमारतीतील बाल्कनी पडली. बाल्कनीतील लाईट सुरू होती आणि एक मुलगी रेलिंगच्या उलट बाजूला बसलेली दिसत होती. ती खाली उडी मारण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्टपणे जाणवत होते.

अरुण सिंह यांनी सांगितले की, सुरुवातीला ती मुलगी खाली उतरली, त्यावेळी दुसऱ्या बहिणीने तिला ओढण्याचा प्रयत्न केला. “मला सुरुवातीला वाटले की कदाचित बहिणींमध्ये वाद सुरू असेल. पण काही सेकंदांतच ती मुलगी पुन्हा रेलिंगवर चढली,” असे त्यांनी सांगितले. यानंतर एका बहिणीने दुसरीला घट्ट मिठी मारली आणि काहीतरी अनर्थ घडणार असल्याची जाणीव त्यांना झाली.

चश्मदीदांच्या म्हणण्यानुसार, काही क्षणांतच तिन्ही बहिणी एकत्र खाली पडल्या. “मला असे वाटले की दोन मुली तिसरीला वाचवण्याचा प्रयत्न करत होत्या. एकीचा निर्णय ठाम दिसत होता, पण अखेरीस तिन्ही बहिणी एकाच वेळी खाली कोसळल्या,” असे अरुण सिंह यांनी सांगितले. त्यांनी तात्काळ पोलिसांना फोन केला, मात्र त्यांच्या कॉलनंतर जवळपास एक तासाने रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्याचेही त्यांनी नमूद केले.

हेही वाचा: Sharad Pawar: 'सुनेत्रा पवारांना संधी मिळाली याचा...'; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

पोलिसांनी घटनास्थळावरून काही हस्तलिखित संदेश (Handwritten Papers) जप्त केले असून, त्यांची तपासणी सुरू आहे. तसेच, तिन्ही बहिणी एका कोरियन टास्क आधारित गेमिंग अ‍ॅपच्या (Korean Task-Based Gaming App) आहारी गेल्या होत्या, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मात्र, या अ‍ॅपचा या घटनेशी थेट संबंध आहे का, याबाबत पोलीस सखोल चौकशी करत आहेत. पोलिस आणि चश्मदीदांच्या जबाबांवरून हा अँगल सध्या सर्वाधिक ठळक मानला जात आहे.

सध्या या प्रकरणात आत्महत्येचा संशय व्यक्त करण्यात आला असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी (Post-Mortem) पाठवण्यात आले आहेत. पोलिसांकडून कुटुंबीयांची चौकशी सुरू असून, घटनेमागील नेमकी कारणे स्पष्ट करण्यासाठी सर्व बाजूंनी तपास केला जात आहे. ही घटना अल्पवयीन मुलांच्या मानसिक आरोग्याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करणारी ठरत आहे.

हेही वाचा: Gold Silver Rates Today: सोने-चांदीच्या दरात पुन्हा खळबळ; कालची घसरण आणि आजची मोठी वाढ; पाहा सराफ बाजारात नक्की काय घडतंय?


सम्बन्धित सामग्री