Raid On ARTO: भिंतीत सोनं अन् बेडमध्ये नोटांचा खजिना… माजी ARTO अधिकाऱ्याच्या घरात दक्षता विभागाचा छापा

भ्रष्टाचाराच्या आरोपांशी संबंधित तपासाचा भाग म्हणून 7 आणि 8 जुलै रोजी अलीगंज परिसरातील त्यांच्या निवासस्थानी ही कारवाई करण्यात आली.

Raid On ARTO: भिंतीत सोनं अन् बेडमध्ये नोटांचा खजिना… माजी ARTO अधिकाऱ्याच्या घरात दक्षता विभागाचा छापा

Raid On ARTO: उत्तर प्रदेशातील आग्रा येथे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी (ARTO) म्हणून कार्यरत असलेले माजी अधिकारी ललित कुमार यांच्या लखनौमधील घरावर दक्षता विभागाने मोठी छापेमारी केली आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपांशी संबंधित तपासाचा भाग म्हणून 7 आणि 8 जुलै रोजी अलीगंज परिसरातील त्यांच्या निवासस्थानी ही कारवाई करण्यात आली. झडतीदरम्यान घरातील फर्निचर, कपाटे आणि भिंतींची तपासणी करण्यात आली असता मोठ्या प्रमाणात लपवून ठेवलेली संपत्ती उघडकीस आली.

रोकड, सोने, चांदी आणि हिऱ्यांचे दागिने जप्त

तपास पथकाला कारवाईदरम्यान 1.62 कोटींची रोकड सापडली. याशिवाय 13 किलो शुद्ध सोने, 9 किलो चांदी आणि मोठ्या प्रमाणात हिऱ्यांचे मौल्यवान दागिनेही जप्त करण्यात आले. या जप्तीमुळे संबंधित अधिकाऱ्याच्या संपत्तीबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले असून, या मालमत्तेच्या स्रोताची चौकशी सुरू आहे.

दागिन्यांसह आलिशान गाड्यांचाही समावेश

दक्षता विभागाच्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेल्या सोने, चांदी आणि हिऱ्यांच्या दागिन्यांची अंदाजे बाजारमूल्य सुमारे 20 कोटी इतके आहे. याशिवाय घरातून 2 आलिशान कार आणि 1 परवानाधारक रिव्हॉल्व्हरही जप्त करण्यात आला आहे. तपासादरम्यान विविध बँका, पोस्ट ऑफिस, म्युच्युअल फंड आणि फिक्स डिपॉझिट योजनांमध्ये 1 कोटींपेक्षा अधिक रकमेची गुंतवणूक केल्याची कागदपत्रेही अधिकाऱ्यांच्या हाती लागली आहेत.

अनेक शहरांमध्ये स्थावर मालमत्तेचा शोध

ललित कुमार यांच्याविरोधात 2024 मध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर सुरू झालेल्या तपासात त्यांच्या नावे विविध शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्थावर मालमत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. लखनौ, नोएडा, बाराबंकी आणि रायबरेली येथे निवासी भूखंड, आलिशान फ्लॅट्सचे बुकिंग तसेच शेतजमिनींची खरेदी केल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले आहे.

हेही वाचा – Crime News: अवघ्या 41 दिवसांत न्याय… 18 महिन्यांच्या पुतण्याला जमिनीवर आपटून मारणाऱ्या नराधम काकाला फाशीची शिक्षा

बेकायदेशीर संपत्तीची चौकशी आणखी वेगाने

छापेमारीत मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे संबंधित माजी अधिकाऱ्याच्या संपत्तीचा सखोल तपास सुरू करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेली रोकड, दागिने, गुंतवणुकीची कागदपत्रे आणि स्थावर मालमत्तेच्या आधारे पुढील कायदेशीर प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे दक्षता विभागाने स्पष्ट केले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number