Air India Employee Wife Death: पतीच्या मोबाईलमधील एका फोटोवरून राडा.. तडक दुसऱ्या खोलीत जात उच्चशिक्षित पत्नीने केलं असं..

रात्रीच्या भांडणानंतर सकाळी खूप वेळ दारावर थाप मारूनही आतून प्रतिसाद न मिळाल्याने युवराज यांनी बाल्कनीच्या खिडकीतून आत डोकावले. तेव्हा..

Air India Employee Wife Death: पतीच्या मोबाईलमधील एका फोटोवरून राडा.. तडक दुसऱ्या खोलीत जात उच्चशिक्षित पत्नीने केलं असं..

Air India Employee Wife Suicide: एका लक्झरी सोसायटीत राहणाऱ्या 44 वर्षीय उच्चशिक्षित महिलेच्या आत्महत्येने खळबळ उडाली आहे. तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, कीर्तिमई मिश्रा असे या महिलेचे नाव आहे. बुधवारी रात्री सुमारे 9:30 वाजता कीर्तिमई यांनी पती युवराज शर्मा यांचा मोबाईल तपासला असता गॅलरीमध्ये एअर इंडिया अकादमीच्या स्टाफ फोटोंसोबत एका महिला सहकाऱ्याचा फोटो दिसला. या फोटोवरून कीर्तिमई यांच्या मनात संशय निर्माण झाला अन् दोघांमध्ये तीव्र बाचाबाची सुरू झाली. या भांडणानंतर संतापाच्या भरात त्यांनी स्वतःला दुसऱ्या खोलीत बंद करून घेतले आणि गळफास लावून जीवन संपवले. हरियाणातील गुरुग्रामच्या सेक्टर-71 मध्ये ही दुर्दैवी घटना घडली.

15 वर्षांचा संसार अन् दुर्दैवी शेवट; एअर इंडिया कर्मचाऱ्याची पत्नी होती उच्च पदस्थ
मूळच्या ओडिशातील भुवनेश्वर येथील रहिवासी असलेल्या कीर्तिमई या गुरुग्राममधील स्मार्ट वर्ल्ड कंपनीत लर्निंग अँड टॅलेंट डेव्हलपमेंट हेड म्हणून कार्यरत होत्या. त्यांचे पती युवराज शर्मा हे मुंबईचे रहिवासी असून एअर इंडियामध्ये केबिन क्रूला प्रशिक्षण देण्याचे काम करतात. सुमारे 15 वर्षांपूर्वी दोघांनी प्रेमविवाह केला होता आणि त्यांना 9 वर्षांची एक मुलगीही आहे. कौटुंबिक सुखात चालू असलेल्या या संसारात एका फोटोवरून निर्माण झालेल्या संशयाने भीषण वळण घेतले.

हेही वाचा – Pune Crime : प्रियकरासोबत मौजमजा! नवऱ्याने बायकोला रंगेहाथ पकडलं, पण पतीलाच बेदम मारहाण, 18 हजारही लांबवले

सकाळी बाल्कनीतून पाहिले अन् उघडकीस आला प्रकार; भावाने 4 दिवसांपूर्वीच बांधली होती राखी
रात्रीच्या भांडणानंतर सकाळी खूप वेळ दारावर थाप मारूनही आतून प्रतिसाद न मिळाल्याने युवराज यांनी बाल्कनीच्या खिडकीतून आत डोकावले. तेव्हा कीर्तिमई पंख्याला लटकलेल्या अवस्थेत दिसल्या. दरवाजा तोडताना युवराज यांच्या हाता-पायाला जखमा झाल्या. अवघ्या 4 दिवसांपूर्वीच कीर्तिमई यांचा धाकटा भाऊ परदेशात शिक्षणासाठी जाण्यापूर्वी गुरुग्रामला येऊन राखी बांधून गेला होता. बहिणीच्या निधनाची बातमी मिळताच तो शुक्रवारी सकाळी विमानाने तातडीने परतला, ज्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

पोलिसांकडून प्रकरणाची सखोल चौकशी सुरू
घटनेची माहिती मिळताच बादशाहपूर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांना दिलेल्या निवेदनात पतीने घडलेल्या सर्व प्रसंगाची माहिती दिली आहे. या प्रकरणात कौटुंबिक वाद आणि संशयातून ही दुर्दैवी घटना घडल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले असून, पोलीस या आत्महत्येच्या सर्व तांत्रिक आणि व्यावहारिक बाजूंची सखोल चौकशी करत आहेत.

हेही वाचा – Crime News: मॉडेल मुस्कान शर्माला मारण्यापूर्वी इम्रानचे 'इन्स्टाग्राम लाईव्ह'; पोलिसांकडून महत्त्वाचा उलगडा

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number