Pune Ketan Agrawal Case : ‘माझं डेअरिंग होत नाही…’ केतनला संपवण्यासाठी सिया-चेतनने असा आखला होता मास्टर प्लॅन; एका चॅटने उघड झाले कटकारस्थान

पुण्यातील केतन अग्रवाल प्रकरणाने संपूर्ण राज्याला हादरवून ठेवलं आहे. सुरुवातीला अपघात वाटणाऱ्या या प्रकरणात पोलिसांनाही चक्रवातील असे खुलासे समोर आले आहेत.

Pune Ketan Agrawal Case : ‘माझं डेअरिंग होत नाही…’ केतनला संपवण्यासाठी सिया-चेतनने असा आखला होता मास्टर प्लॅन; एका चॅटने उघड झाले कटकारस्थान

पुण्यातील केतन अग्रवाल प्रकरणाने संपूर्ण राज्याला हादरवून ठेवलं आहे. सुरुवातीला अपघात वाटणाऱ्या या प्रकरणात पोलिसांनाही चक्रवातील असे खुलासे समोर आले आहेत. केतनत्या हत्येमागचा सुत्रधार दुसरा तिसरा कोणी नसून त्याचीच होणारी बायको सिया गोयल ही होती. तिने तिचा प्रियकर चेतन याच्यासोबत मिळून केतनचा काटा काढला होता. दोघेही सध्या पोलीस कस्टडीत असून या प्रकरणात नवीन आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. नुकताच या प्रकरणात बीड मधील चेतनच्या मित्राचं देखील नाव समोर आलं होत. मात्र त्याला सिया आणि चेतनच्या प्लॅनची माहिती असून तो स्वतः त्यांच्या प्लॅनमध्ये सामील झाला नसल्याचे त्याने स्पष्ट केले होते. 

दरम्यान आता या प्रकरणात झालेल्या धक्कादायक खुलास्यानंतर पोलिसही चक्रावले आहेत. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार सिया आणि चेतनने केतनला लोहगडावरून ढकल्यानंतर सियाने केतनचा फोन स्वतःच्या ताब्यात घेतला होता. त्याचे कुटुंबीय तिथे पोहचण्यापूर्वीच सियाने केतनच्या फोनमधील चॅट्स आणि बराच डाटा डिलीट केला होता. या चलाख जोडप्याने गुन्ह्याचे पुरावे नष्ट करण्यासाठी कोणतीही कसर सोडली नव्हती.

हेही वाचा- Mumbai SRPF Jawan : धक्कादायक! कर्तव्यावर असताना लोकभवन परिसरातील SRPF जवानाने उचललं टोकाचं पाऊल

यानंतर आता पुणे पोलिसांनी तांत्रिक तपासावर भर दिल्यानंतर आरोपींच्या मोबाईलचा डेटा, डिलीट केलेले मेसेज, लोकेशन आणि इंटरनेट सर्च हिस्ट्री पोलिसांच्या हाती लागल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिया आणि चेतनने गेल्या काही महिन्यांपासून देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये झालेल्या मोठ्या हत्याकांडांचा इंटरनेटवर सखोल अभ्यास केला होता. मिळालेल्या माहितीनुसार, सिया गोयलने गुगलवर अनेक धक्कादायक गोष्टी सर्च केल्या होत्या. यावेळी, 23 मे 2025 रोजी मध्य प्रदेशातील इंदूर येथील सोनम रघुवंशीने तिच्या नवऱ्यासोबत जे केल, त्यानंतर सोनम रघुवंशी हिला जामीन कसा मिळाला, तिला तपासात कोणते प्रश्न विचारले, पोलीस कोठडीत महिला आरोपींना मारहाण होते का त्यांना कशी वागणूक मिळते, हत्या केल्यानंतर पोलिसांना संशय कसा येणार नाही, पुरावे कसे मिळणार नाहीत अशा पद्धतीचे संशोधन केले. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन तिने आणि चेतनने केतनला लोहगडावरून ढकलून देण्याचा प्लॅन आखला. 

तर केतनला मारण्याचा पहिला प्रयत्न सियाच्या भीतीमुळे अपयशी ठरला, याबद्दलची माहिती त्या दोघांच्या व्हॉट्सॲपवरील चॅटिंगमुळे उघड झाले. सियाने चेतनला मॅसेज करत म्हटलं होते की, "माझं डेअरिंग होत नाहीये… तू सोबत चल. दोघे मिळून त्याला दरीत ढकलून देऊ" या पुराव्यामुळे केतनची हत्या झाल्याचे समोर आले आणि सिया-चेतनचं कांड समोर आले. दरम्यान केतनच्या हत्येचा प्लॅन इतका परफेक्ट होता की पोलिसांची पुरावे गोळा करताना दमछाक झाली. या प्रकणाची सिया आणि चेतन दोघांकडूनही कसून चौकशी सुरु असून पोलिसांच्या हाती इतर ठोस धागेदोरे लागण्याची शक्यता आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number