खळबळजनक! पतीने आवळला पत्नीचा गळा; नंतर स्वत:ही उचललं टोकाचं पाऊल, कंपनीला ई-मेल पाठवून दिली माहिती

सेक्टर 68 मधील 'एम३एम मरीना' या उच्चभ्रू सोसायटीतील एका फ्लॅटमध्ये पतीने आधी आपल्या पत्नीला गळा आवळून निर्घृणपणे संपवलं आणि त्यानंतर स्वतःही गळफास घेऊन आयुष्य संपवले.

खळबळजनक! पतीने आवळला पत्नीचा गळा; नंतर स्वत:ही उचललं टोकाचं पाऊल, कंपनीला ई-मेल पाठवून दिली माहिती
Husband strangles wife to death

हरियाणातील गुरुग्राममधून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. सेक्टर 68 मधील ‘एम३एम मरीना’ या उच्चभ्रू सोसायटीतील एका फ्लॅटमध्ये पतीने आधी आपल्या पत्नीला गळा आवळून निर्घृणपणे संपवलं आणि त्यानंतर स्वतःही गळफास घेऊन आयुष्य संपवले. ही दुर्दैवी घटना बुधवारी रात्री घडल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणात 30 वर्षीय मोहम्मद अस्लम आणि त्याची 28 वर्षीय पत्नी फरहाना अशी मृत जोडप्याची नावे आहेत. हे दाम्पत्य मूळचे केरळ राज्यातील रहिवासी असून कामानिमित्त गुरुग्राममध्ये भाड्याने राहत होते. अस्लम एका खासगी कंपनीत नोकरीला होता.

कंपनी मालकाला पाठवला शेवटचा ईमेल

टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी मोहम्मद अस्लमने त्याच्या कंपनीच्या अधिकृत ई-मेल आयडीवर एक मेसेज पाठवला होता. या ई-मेलमध्ये त्याने आपल्या वडिलांचा आणि घरमालकाचा मोबाईल क्रमांक लिहून ठेवला होता. तसेच घडलेल्या संपूर्ण घटनेची माहिती त्यांना देण्याची विनंती केली होती. हा ई-मेल वाचताच कंपनीचे अधिकारी शॉक झाले आणि त्यांनी तातडीने घरमालकाशी संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर घरमालकाने क्षणाचाही विलंब न करता बादशाहपूर पोलीस ठाण्याला माहिती दिली.

हेही वाचा –  पहाटेच्या प्रहरी मृत्यूचं तांडव! प्रवाशांनी भरलेल्या बसला भरधाव ट्रकची जोरदार धडक; भीषण अपघातात 31 जण…

घटनास्थळी पोलिसांची धाव; फॉरेन्सिक तपास आणि शवविच्छेदन सुरू

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी फ्लॅटचा दरवाजा उघडून आत प्रवेश केला. त्या वेळी फरहानाचा मृतदेह जमिनीवर पडलेला दिसला, तर अस्लमचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत लटकताना आढळला. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन तातडीने सिव्हिल हॉस्पिटलच्या शवागारात पाठवले आहेत. प्राथमिक तपासात अस्लम नैराश्यामध्ये असल्याचे निष्पन्न होत असले, तरी कौटुंबिक कलह किंवा इतर काही कारण होते का, याचा शोध घेण्यासाठी पोलीस त्याचा मोबाईल फोन आणि ई-मेल आयडी तपासत आहेत. केरळमधील नातेवाईक पोहोचल्यानंतर पुढील कायदेशीर प्रक्रिया पार पाडली जाईल.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number