Branded Watch Stolen: प्रियकराच्या प्रेमात तरुणी झाली बेभान; वाढदिवसाला महागडे गिफ्ट देण्यासाठी थेट चोरले घडयाळ; सीसीटीव्हीने उघडले गुपित

हैदराबादमधील जुबिली हिल्स परिसरात एका तरुणीने प्रियकराला वाढदिवसाचे गिफ्ट देण्यासाठी दुकानातून दोन महागडी घड्याळे घेतल्याचा प्रकार समोर आला आहे.

Branded Watch Stolen: प्रियकराच्या प्रेमात तरुणी झाली बेभान; वाढदिवसाला महागडे गिफ्ट देण्यासाठी थेट चोरले घडयाळ; सीसीटीव्हीने उघडले गुपित

हैदराबादमधील पॉश जुबिली हिल्स परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रियकराला वाढदिवसानिमित्त महागडे गिफ्ट देण्यासाठी एका तरुणीने थेट घड्याळांच्या दुकानातून चोरी केल्याचा प्रकार उघड झाला आहे. पैशांची कमतरता असल्याने तिने दुकानातून दोन महागडी घड्याळे चोरली, मात्र सीसीटीव्ही फुटेजमुळे तिचा संपूर्ण कट उघडकीस आला.

प्राथमिक माहितीनुसार, संबंधित तरुणी खम्मम परिसरातील रहिवासी आहे. ती तिच्या प्रियकरासोबत कारने जुबिली हिल्स भागात आली होती. दोघेही आधीपासून महागडे गिफ्ट घेण्याचा विचार करत होते, मात्र तिच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. त्यामुळे तिने प्रियकराला कारमध्ये थांबवून जवळच्या एका नामांकित घड्याळांच्या दुकानात प्रवेश केला.

दुकानात गेल्यानंतर तरुणीने अत्यंत हुशारीने टिसोट ब्रँडची दोन महागडी घड्याळे चोरली. चोरी केल्यानंतर कोणालाही संशय न येऊ देता ती दुकानाबाहेर पडली. त्यानंतर तिने ही घड्याळे प्रियकराला वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून दिली. सुरुवातीला प्रियकरालाही ही घड्याळे विकत घेतली असल्याचेच वाटले.

हेही वाचा: Crime News : धक्कादायक! सासऱ्याकडून सुनेवर वर्षभर लैंगिक अत्याचार, क्रूरकृत्यास पतीची संमती; सासरा अटकेत, पती फरार

दरम्यान, दुकानातील कर्मचाऱ्यांना स्टॉक तपासणीदरम्यान घड्याळे गायब असल्याचे लक्षात आले. त्यानंतर दुकान व्यवस्थापकाने सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात संबंधित तरुणी चोरी करताना स्पष्ट दिसून आली. यानंतर दुकान व्यवस्थापकाने जुबिली हिल्स पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

तक्रार मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई करून तरुणीची ओळख पटवली आणि तिला अटक केली. चौकशीत तिचा प्रियकरही त्या वेळी तिच्यासोबत असल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी त्यालाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

पोलिस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ही चोरी आधीपासून नियोजन करून करण्यात आली होती का, की अचानक घेतलेला निर्णय होता, याचा तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी चर्चा रंगली आहे. 

हेही वाचा: Pune Water Supply: पुण्यात आज पाणीपुरवठा सुरू राहणार की बंद?; 'वॉटर शटडाऊन' बाबत मोठी अपडेट समोर

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number