Crime News : ‘मी हे जग सोडून चाललेय…’; पायावर संदेश लिहून 31 वर्षीय विवाहित महिलेने उचललं टोकाचं पाऊल

सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या सततच्या छळाला कंटाळून एका 31 वर्षीय विवाहित महिलेने गळफास घेऊन आपले आयुष्य संपवले आहे.

Crime News : ‘मी हे जग सोडून चाललेय…’; पायावर संदेश लिहून 31 वर्षीय विवाहित महिलेने उचललं टोकाचं पाऊल

Crime News : गुजरात राज्यातील वडोदरा येथील उंडेरा परिसरातून एक अत्यंत सुन्न करणारी आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या सततच्या छळाला कंटाळून एका 31 वर्षीय विवाहित महिलेने गळफास घेऊन आपले आयुष्य संपवले आहे. टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी सीमा नावाच्या या महिलेने आपल्या मांडीवरच हिंदी भाषेत शेवटचा संदेश लिहिला होता. 'मी हे जग सोडून चालले आहे, माझ्या पतीने आपल्या कुटुंबाला आनंदी ठेवावे. मी हे सर्व सहन करू शकत नाही,' अशा शब्दांत तिने आपला शेवटचा निरोप लिहून ठेवला होता.

माहेरून 2 लाख रुपये आणण्यासाठी सातत्याने छळ
मिळालेल्या माहितीनुसार, मयत सीमा हिचा पती सुनीर कुमार याने मे 2026 मध्ये जमिनीचा तुकडा खरेदी करण्यासाठी सीमावर माहेरून 2 लाख रुपये आणण्यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली होती. या पैशांसाठी पती, सासू आणि सासरे तिच्यावर सतत शारीरिक व मानसिक अत्याचार करत असल्याचा गंभीर आरोप तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे. अखेर या त्रासाला वैतागून तिने जीवन संपवले. 9 ऑगस्ट रोजी पतीने स्वतः सीमाच्या नणंदेला फोन करून या आत्महत्येची माहिती दिली.

आठ महिन्यांची चिमुकली पोरकी; माहेरच्यांची न्यायाची मागणी
सीमाच्या या टोकाच्या पावलामुळे तिची अवघ्या 8 महिन्यांची निष्पाप मुलगी आता आईच्या छत्रछायेला पारखी झाली आहे. या घटनेमुळे सीमाच्या माहेरच्यांना मोठा धक्का बसला असून त्यांनी दोषींवर कडक कारवाई करून न्यायाची मागणी केली आहे. या घटनेची दखल घेत पोलिसांनी पती सुनीर कुमार, सासू आणि सासऱ्यांविरुद्ध हुंड्यासाठी छळ करणे आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांचा तपास आणि कायदेशीर कारवाई
घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी महत्त्वाचे पुरावे गोळा केले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण आणि अधिक तपशील स्पष्ट होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणाचा सर्व बाजूंनी सखोल तपास केला जात असून निष्पाप महिलेला आत्महत्येस भाग पाडणाऱ्या एकाही दोषीला सोडले जाणार नाही, असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.

हेही वाचा – Digital Arrest Scam: 'तुमचं आधार कार्ड दहशतवाद्यांकडे…'; बनावट पोलीस बनून निवृत्त प्राध्यापकांची 1 कोटींची फसवणूक

दरम्यान, गुजरातमधील कौटुंबिक हिंसाचाराची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी एप्रलि महिन्यात दाहोद जिल्ह्यात अशाच दोन वेगवेगळ्या घटना घडल्या होत्या. जिथे महिलांनी आपल्या मुलांसह विहिरीत उडी मारून व विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्या घटनांमध्ये महिला वाचल्या असल्या तरी 5 निष्पाप मुलांना आपला जीव गमवावा लागला होता. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number