NEET Student Death: ‘पुन्हा परीक्षा देण्याची ताकद नाही…’; NEET पेपरफुटीच्या नैराश्यातून 18 वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल

आकांक्षा चतुर्वेदी नागपूरमध्ये NEET ची तयारी करत होती. मात्र, परीक्षेतील कथित गैरव्यवहारामुळे निर्माण झालेल्या तीव्र मानसिक तणावातून तिने 20 मे रोजी नागपूरमधील राहत्या घरात आपली जीवनयात्रा संपवली.

NEET Student Death: ‘पुन्हा परीक्षा देण्याची ताकद नाही…’; NEET पेपरफुटीच्या नैराश्यातून 18 वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल

NEET Student Death:  वैद्यकीय प्रवेश परीक्षेभोवती (NEET) निर्माण झालेला गोंधळ आणि पेपरफुटीच्या आरोपांमुळे एका 18 वर्षीय विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशातील मौगंज जिल्ह्यातील मूळची रहिवासी असलेली आकांक्षा चतुर्वेदी नागपूरमध्ये NEET ची तयारी करत होती. मात्र, परीक्षेतील कथित गैरव्यवहारामुळे निर्माण झालेल्या तीव्र मानसिक तणावातून तिने 20 मे रोजी नागपूरमधील राहत्या खोलीत गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेमुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांवरील प्रचंड मानसिक दबाव पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.

मुलीच्या डॉक्टर होण्याच्या स्वप्नासाठी कुटुंबावर कर्ज
आकांक्षाचे वडील कृष्ण कुमार चौबे हे शेतकरी असून, मुलीच्या शिक्षणाचा आणि कुटुंबाचा खर्च भागवण्यासाठी ते नागपूरमध्ये स्वयंपाकी म्हणूनही काम करत होते. मुलीला डॉक्टर बनवण्यासाठी या कुटुंबाने 'किसान क्रेडिट कार्ड' (KCC) द्वारे 3 लाखांचे कर्ज घेतले होते, तसेच नातेवाईकांकडूनही पैसे उसने घेतले होते. परीक्षा दिल्यानंतर आकांक्षाला चांगल्या गुणांसह वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळण्याची पूर्ण खात्री होती. मात्र, देशभरात NEET परीक्षेतील घोटाळ्याच्या आणि फेरपरीक्षेच्या चर्चा सुरू झाल्यानंतर ती प्रचंड नैराश्यात गेली होती.

'मला माफ करा…' : चिठ्ठीतील शब्द ठरले हृदयद्रावक
घटनेनंतर आकांक्षाने लिहिलेली एक कथित सुसाईड नोट पोलिसांना सापडली आहे, ज्यामध्ये तिने आपल्या पालकांची माफी मागितली आहे. सुरुवातीला चांगला पेपर जाऊनही आता उद्भवलेल्या परिस्थितीमुळे जर दुसऱ्यांदा परीक्षा द्यावी लागली, तर तेवढे धैर्य आणि ताकद आपल्यात उरलेली नाही, असे तिने चिठ्ठीत नमूद केले आहे. पालकांच्या आर्थिक परिस्थितीची जाणीव आणि त्यांच्या अपेक्षा पूर्ण न करू शकण्याच्या भीतीने तिने हे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा – Jalgaon Crime: जळगाव हादरलं! 15 वर्षीय मुलाच्या हाती गाडीचं स्टिअरिंग, 9 जणांना उडवलं, 5 जण गंभीर जखमी

विद्यार्थी संघटनेकडून मदतीचा हात
या दुर्दैवी घटनेनंतर मध्य प्रदेशातील राजकीय वातावरण तापले असून विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरले आहे. विरोधी पक्षनेते उमंग सिंघार आणि युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यश घोंगोरिया यांनी पीडित कुटुंबाचे सांत्वन केले. दरम्यान, NSUI चे राष्ट्रीय अध्यक्ष विनोद जाखर यांनी मौगंज येथे जाऊन आकांक्षाच्या कुटुंबाची भेट घेतली. विद्यार्थी संघटनेच्या वतीने पीडित कुटुंबाला 2.5 लाखांची तात्काळ आर्थिक मदत जाहीर करण्यात आली असून, त्यांचे 3 लाखांचे बँक कर्ज फेडण्यासाठीही मदत करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number