‘बायकोला घटस्फोट देऊन तुझ्याशी लग्न करतो…’, लग्नाचे आमीष देत अत्याचार; आरोपी मोकाट, पीडितेचा जीव संपवण्याचा प्रयत्न

नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

‘बायकोला घटस्फोट देऊन तुझ्याशी लग्न करतो…’, लग्नाचे आमीष देत अत्याचार; आरोपी मोकाट, पीडितेचा जीव संपवण्याचा प्रयत्न

नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. संत निवृत्तिनाथ महाराज संस्थानच्या अध्यक्षांवर अत्याचार, मारहाण, धमकी या कलमांतर्गत इंदिरा नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपीला अटक न झाल्याने पीडितेने जीवन संपवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे पीडितेची प्रकृती चिंताजनक आहे.

नेमके प्रकरण काय?
संत निवृत्तिनाथ महाराज संस्थानचे अध्यक्ष राहुल साळुंखे यांच्या विरोधात अत्याचार, मारहाण आणि धमकावल्याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पीडितेच्या आरोपानुसार, स्वतःच्या पत्नीला घटस्फोट देतो आणि तुझ्याशी लग्न करतो, असे आमिष दाखवून राहुल साळुंखे याने गेल्या तीन वर्षांपासून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले. पीडितेने लग्नासाठी तगादा लावला असता तिला मारहाण करून तोंड बंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला. इतकेच नाही, तर तिचे खासगी फोटो व्हायरल करण्याची आणि तिला व तिच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही पीडितेने केला आहे.आरोपीला त्याच्या पदामुळे अटक होत नसल्याने नैराश्यातून पीडितेने टोकाचे पाऊल उचलले असल्याची, माहिती समोर आली आहे. सध्या तिची प्रकृती चिंताजनक असून तिला अतिदक्षता विभागात (ICU) दाखल करण्यात आले आहे.

या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू असून आरोपी राहुल साळुंखे याला लवकरात लवकर अटक करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

 

 

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number