Crime News : धक्कादायक! सासऱ्याकडून सुनेवर वर्षभर लैंगिक अत्याचार, क्रूरकृत्यास पतीची संमती; सासरा अटकेत, पती फरार

विजय चिडे, प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. पतीच्या संमतीनेच सासऱ्याकडून सुनेवर तब्बल वर्षभर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सासऱ्याला अटक केली असून पती सध्या फरार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 23 वर्षीय विवाहित महिलेचा विवाह 2019 मध्ये झाला होता. ती […]

Crime News : धक्कादायक! सासऱ्याकडून सुनेवर वर्षभर लैंगिक अत्याचार, क्रूरकृत्यास पतीची संमती; सासरा अटकेत, पती फरार

विजय चिडे, प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. पतीच्या संमतीनेच सासऱ्याकडून सुनेवर तब्बल वर्षभर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सासऱ्याला अटक केली असून पती सध्या फरार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 23 वर्षीय विवाहित महिलेचा विवाह 2019 मध्ये झाला होता. ती पती, सासू-सासरे आणि लहान मुलांसह राहत होती. गेल्या वर्षभरापासून सासरा तिच्यावर वारंवार अत्याचार करत असल्याचा आरोप आहे. सुरुवातीला पीडितेने विरोध केला, मात्र तिला धमकावण्यात येत होते. धक्कादायक बाब म्हणजे, हा प्रकार पतीच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्याने पत्नीला साथ देण्याऐवजी उलट सासऱ्याच्या वर्तनाचे समर्थन केल्याचे समोर आले आहे. इतकेच नाही, तर पतीने पत्नीशी संवाद कमी करून दुसऱ्या महिलेसोबत संबंध ठेवत काही महिन्यांपूर्वी घर सोडले. दरम्यान, पीडित महिलेने सामाजिक बदनामीच्या भीतीने हा प्रकार बराच काळ दडपून ठेवला. मात्र अखेर माहेरी गेल्यानंतर तिने आई आणि भावाला सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर हा गंभीर प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

हेही वाचा : Road Accident: मठात दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात; चिमुकलीसह आठ जणांचा जागीच अंत

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number