बारामती : बारामती विमानतळ परिसरात राणा शिपिंग कंपनीचे मालक राणा सूर्यवंशी यांच्यावर झालेला हल्लाच्या तपासाच्या संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. उद्योगपती राणा सूर्यवंशी यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी करमाळयातील नवनाथ झोळ यांना चौकशीसाठी बारामती पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा भाजप नेते रामदास झोळ यांचे नवनाथ झोळ हे बंधू आहेत. तर रामदास झोळ भोंदू मनोहर भोसले प्रकरणात आरोपी आहे. दरम्यान, करमाळयातून नवनाथ झोळ यांना बारामती पोलीस चौकशीसाठी घेऊन गेले असल्याची माहिती आहे. दरम्यान, भोंदू मनोहर भोसले प्रकरणात दत्तकला शिक्षण संस्थेचे रामदास झोळ हे सध्या फरार आहेत. तर त्यांची पत्नी माया झोळ अटकेत आहे. अशातच आता उद्योगपती राणा सूर्यवंशी यांच्यावर बारामतीतील हल्ल्याप्रकरणी नवनाथ झोळची चौकशी होणार असून या चौकशीत काही कनेक्शन उघड होतं का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.