शाळेत जाताना काळाचा घाला! जळगावमधील भीषण रिक्षा अपघातात 9 वीतील विद्यार्थ्याचा जागीच अंत, इतर विद्यार्थी गंभीर जखमी

जळगाव जिल्ह्यातून एक हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. उमाळा-कंडारी रस्त्यावर शाळकरी विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या रिक्षेचा भीषण अपघात झाला आहे.
शाळेत जाताना काळाचा घाला! जळगावमधील भीषण रिक्षा अपघातात 9 वीतील विद्यार्थ्याचा जागीच अंत, इतर विद्यार्थी गंभीर जखमी

जळगाव जिल्ह्यातून एक हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. उमाळा-कंडारी रस्त्यावर शाळकरी विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या रिक्षेचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात इयत्ता नववीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, इतर दहा विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत.

मृत विद्यार्थ्याचे नाव अर्जुन कोळी (वय 16) असे असून तो कंडारी येथील रहिवासी होता. अर्जुनच्या मृत्यूने कोळी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण कंडारी गावावर शोककळा पसरली आहे.

नेमके काय घडले?

मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात रिक्षाचालकासह एकूण 11 विद्यार्थी जखमी झाले. स्थानिकांनी तातडीने धाव घेऊन सर्व जखमींना जवळच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. जखमींमध्ये मृत अर्जुनचा चुलत भाऊ देखील असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. इतर काही विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

हेही वाचा – भोळा चेहरा, पण कारनामे भलतेच! बसमध्ये महिलांचा खेळ संपला; नक्की घडलं काय?

प्राथमिक माहितीनुसार, रिक्षामध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी बसवणे आणि चालकाचा निष्काळजीपणा हे अपघाताचे कारण असल्याचे बोलले जात आहे. मात्र, या अपघातामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी रिक्षाचालकावर निष्काळजीपणे वाहन चालवून विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ग्रामीण भागात शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी असलेल्या बेकायदेशीर आणि धोकादायक रिक्षा सेवांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version