Crime News: गुप्तांगावर लाईटरचे चटके, छातीच्या 7 बरगड्या तुटल्या… ;18 महिन्यांच्या चिमुकल्यावर आईच्या प्रियकराचे अमानुष अत्याचार; निर्दयी आई…

केरळमधील तिरुवनंतपुरममध्ये 18 महिन्यांच्या बाळाचा अमानुष छळ करून हत्या करण्यात आली

Crime News: गुप्तांगावर लाईटरचे चटके, छातीच्या 7 बरगड्या तुटल्या… ;18 महिन्यांच्या चिमुकल्यावर आईच्या प्रियकराचे अमानुष अत्याचार; निर्दयी आई…

तिरुवनंतपुरम: केरळच्या तिरुवनंतपुरममधून माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. एका 18 महिन्यांच्या निष्पाप बालकाच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करत असताना, पोस्टमार्टम रिपोर्टमधून जे भयानक वास्तव समोर आले आहे, त्याने पोलीस प्रशासनासह संपूर्ण देश हादरून गेला आहे. त्या लहानग्या जीवावर प्रदीर्घ काळापासून अमानुष आणि क्रूर अत्याचार केले जात होते, यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे.

पोस्टमार्टम रिपोर्टमधील धक्कादायक खुलासे
वैद्यकीय अहवालानुसार, या चिमुरड्याच्या शरीरावर तब्बल 91 जखमांच्या खुणा आढळल्या आहेत. इतकेच नव्हे, तर त्याच्या छातीच्या तब्बल 7 बरगड्या तुटलेल्या होत्या. अंतर्गत अवयवांना झालेली गंभीर दुखापत आणि कवटीच्या आत झालेला अंतर्गत रक्तस्त्राव यामुळेच या बाळाचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी अशकर याने बाळाच्या छातीवर पाय ठेवून अत्यंत क्रूरपणे दाबल्यामुळे त्याच्या बरगड्या मोडल्या होत्या. नराधम अशकर एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने सिगरेट लायटरने बाळाच्या गुप्तांगावर आणि पायाच्या तळव्यावर चटके दिल्याचेही समोर आले आहे.

आईने रचला होता खोटा बनाव
सुरुवातीला बाळाचा मृत्यू अपघाती दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. बाळाची आई अखिला आणि तिचा साथीदार अशकर यांनी पोलिसांना सांगितले होते की, मुलगा पायऱ्यांवरून खाली पडल्यामुळे त्याच्या हाताचे हाड मोडले होते आणि त्याला दुखापत झाली होती. मात्र, डॉक्टरांच्या अहवालाने हा बनाव पूर्णपणे उधळून लावला. पोलिसी खाक्या दाखवताच आरोपी अशकर याने आपला गुन्हा कबूल केला. अखिला आणि त्याच्या प्रेमसंबंधांमध्ये हे 18 महिन्यांचे मूल अडथळा ठरत होते, म्हणूनच त्याला संपवण्याचा पूर्वनियोजित कट रचण्यात आला होता, अशी कबुली त्याने दिली. या गुन्ह्यात साथ दिल्याप्रकरणी आणि पुरावे लपवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आता आई अखिलाविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

आरोपीचा गुन्हेगारी इतिहास
पोलिसांनी आरोपी अशकरविरुद्ध अनुसूचित जाती आणि जमाती (SC/ST) अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तपासादरम्यान अशकरबद्दल आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. यापूर्वी त्याने आपल्या पहिल्या पत्नीलाही इतकी बेदम मारहाण केली होती की, ती दिव्यांग (अपंग) झाली होती. काही काळापूर्वीच तिचा संशयास्पद मृत्यू झाला होता. आता पोलीस त्या जुन्या प्रकरणाचीही नव्याने सखोल चौकशी करणार आहेत.
हे हत्याकांड केवळ एका बालकाचा मृत्यू नसून, क्रूरतेची परिसीमा गाठणारी घटना आहे. प्रेमसंबंधांसाठी एका निष्पाप जीवाचा बळी घेणाऱ्या या नराधमांना कठोरतली कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी आता सर्व स्तरातून होत आहे. या घटनेत आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध तिरुवनंतपुरम पोलीस घेत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number