Ketan Agarwal Murder Case : "तिलाही तसंच खाली ढकला, एक वडील म्हणून मी सांगेन" केतनला जीवे मारणाऱ्या सियाविरोधात आई-वडिलांनी केली मोठी मागणी

केतन अग्रवाल हत्या प्रकरणात सियाचं नाव समोर आल्यावर तिला अटक केल्यावर, तिचे वडील, प्रवीण गोयल यांना मोठा धक्का बसला. केतनच्या मृत्यूनंतर सियाच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. 

Ketan Agarwal Murder Case : &quotतिलाही तसंच खाली ढकला, एक वडील म्हणून मी सांगेन&quot केतनला जीवे मारणाऱ्या सियाविरोधात आई-वडिलांनी केली मोठी मागणी

18 जूनला लोहगड किल्ला (लोणावळा) येथील ट्रेकिंगदरम्यान दरीत पडून झालेल्या केतन विशाल अग्रवाल या तरुणाच्या मृत्यू प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले आहे. सुरुवातीला सेल्फी घेताना तोल जाऊन झालेला अपघात वाटणारी ही घटना प्रत्यक्षात पूर्वनियोजित घातपात (खून) असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघड झाले आहे. त्याच्या होणाऱ्या बायकोने सिया गोयलने तिचा प्रियकर चेतन चौधरी याच्यासोबत मिळून केतनला लोहगडावरून ढकलून देण्याचा डाव आखला होता.

हेही वाचा- Nagpur Accident : गाडीचे चाक प्रणयच्या डोक्यावरून गेले अन्…; वाढदिवसाच्या पार्टीला गेलेल्या तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू

हे उघड झाल्यानंतर आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी ला वडगाव न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अधिक चौकशीसाठी न्यायालयाकडे पोलीस कोठडीची मागणी केली होती. त्यानुसार न्यायालयाने 29 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या केसमध्ये सियाचं नाव समोर आल्यावर तिला अटक केल्यावर, तिचे वडील, प्रवीण गोयल यांना मोठा धक्का बसला. त्यांना हृदय विकाराचा झटका आल्याने ते सध्या रुग्णालयात दाखल आहेत. तर याच पार्श्वभूमिवर केतनच्या मृत्यूनंतर सियाच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. 

यावेळी ते म्हणाले की, “केतन गेलाय ही अत्यंत दुःखद घटना आहे. माझी मुलगी असे काहीतरी करू शकते, यावर विश्वास ठेवणं अजूनही मला कठीण जात आहे. या दुर्दैवी घटनेबाबत एकमेव दिलासा तेव्हाच मिळेल, जेव्हा दोषीला शक्य तितकी कठोर शिक्षा होईल. ज्याप्रमाणे आमचा केतन त्या किल्ल्यावरून खाली पडला, त्याचप्रमाणे या हत्येसाठी जो कोणी दोषी असेल. जर माझी मुलगी दोषी आढळली, तर न्यायालयाने न्याय देण्यात विलंब करू नये. तिला योग्य ती शिक्षा मिळाली पाहिजे. अग्रवाल कुटुंबाने आपला मुलगा गमावला, मी त्याला माझ्या स्वतःच्या मुलासारखेच मानू लागलो होतो. माझी स्वतःची मुलगी दोषी असेल तर तिलाही त्याच ठिकाणावरून खाली ढकलून दिले पाहिजे. असं एक वडील म्हणून मी सांगेन. हे नातं जुळल्यापासून सिया नेहमी म्हणायची केतन खूप छान आहे, मला खूप चांगलं सासर मिळालं आहे.”

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number