कुर्ल्यात लिफ्टचा थरार! केबल तुटली, लिफ्ट सहा मजले खाली; 14 जणांचा जीव तीन तास टांगणीला

कुर्ला पूर्वेतील नेहरू नगर येथील 'मास मेट्रोपोलिस' या बहुमजली इमारतीत काल रात्री भीषण घटना घडली.

कुर्ल्यात लिफ्टचा थरार! केबल तुटली, लिफ्ट सहा मजले खाली; 14 जणांचा जीव तीन तास टांगणीला

अविनाश माने, मुंबई: कुर्ला पूर्वेतील नेहरू नगर येथील ‘मास मेट्रोपोलिस’ या बहुमजली इमारतीत काल रात्री भीषण घटना घडली. वाढदिवसाची पार्टी आटोपून लिफ्टमधून खाली येत असताना 14 जण लिफ्टमध्ये अडकले. लिफ्टची केबल तुटल्याने लिफ्ट सहा मजले खाली कोसळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 14 व्या मजल्यावरील वाढदिवसाची पार्टी संपल्यानंतर नातेवाईक आणि पाहुणे लिफ्टने खाली येत होते. लिफ्ट सहाव्या मजल्यावर येताच मोठा आवाज झाला आणि केबलने पकड सोडली. लिफ्ट वेगाने खाली कोसळू लागली. लिफ्टमधील लोक एकमेकांवर पडले, लहान मुले घाबरली. तळमजल्याच्या थोडे आधी मोठ्या धक्क्यासह लिफ्ट अचानक थांबली.

हेही वाचा – दुष्काळाच्या झळा असह्य! करमाळ्यातील शेतकऱ्याने उचललं टोकाचं पाऊल; चिठ्ठीत नेमकं काय?

लिफ्ट थांबली खरी, पण दरवाजा काही उघडेना. आतमध्ये अंधार, ऑक्सिजनची कमतरता आणि प्रचंड भीती यामुळे लोकांनी आपत्कालीन अलार्म वाजवला. आवाज ऐकून इमारतीतील रहिवासी धावून आले. त्यांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, पण यश आले नाही.

त्यानंतर तात्काळ पोलीस आणि अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. नेहरू नगर पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी कटर आणि हायड्रॉलिक जॅकच्या मदतीने बचावकार्य सुरू केले. जवळपास तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर सर्व 14 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. बाहेर आल्यानंतर अनेकांचे चेहरे भीतीने फिके पडले होते. याप्रकरणी नेहरू नगर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number