मध्य प्रदेशातील अनूपपुर जिल्ह्यातून काळीज पिळवटून टाकणारी घटना नुकतीच समोर आलेली आहे. घरातील मुलानेच रागाच्या भरात आपल्याच कुटुंबातील सदस्यांची हत्या केली आहे. या थरारक घटनेत तब्बल 4 जणांचा जागीच मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर जखमी आहे.
तरुण गावी आला आणि घरात घडलं धक्कादायक कांड
मिळालेल्या माहितीनुसार, ही धक्कादायक घटना अमोदा बिजौरा गावातील आहे. जिथं आरोपी प्रेम सिंह हा त्याच्या आईसह एका आठवड्यापूर्वीच त्याच्या आजी-आजोबांकडे आला होता. मूळचा हा मरदरी गावचा असल्याचं सांगितलं जात आहे. शुक्रवारी आरोपीने शनि धामचे पुजारी गंगा सिंह यांना बेदम मारहाम केली होती. त्यामुळे संतापलेल्या गावातील लोकांनी त्याला पकडून रस्सीने बांधून ठेवले होते.
मुलाला बांधलेले पाहून आई तिला मायेने सोडवण्यासाठी गेली, पण हिच सगळ्यात मोठी चूक ठरली. रस्तीतून सुटताच त्या नराधमाने पहिला हल्ला आपल्याच जन्मदात्या आईवरच केला. काठीने ठेचून तिला त्याने संपवले. एवढ्यावर हा थांबला नाही, तर त्याने आई-आजोबांनही ठार केले. त्यानंतर त्याने मामसह त्याच्या कुटुंबातील इतर व्यक्तींवर हल्ला केला. ज्यामध्ये अवघ्या 5 वर्षांच्या निष्पाप चिमुकलीहा समावेश असून तिचा हल्ल्यात मृत्यू झाला.
हत्याकांडातील आरोपीला अटक
सध्या पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, आरोपी हा मानसिक रुग्ण असल्याची चर्चा आहे. एक वर्षापूर्वीही त्याने आपल्याच आईलाही मारहाण केल्याने तो जेलमध्ये गेला होता, अशी माहिती समोर येत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.