महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, गुन्हेगारी, हवामान, वाहतूक, स्थानिक घटना आणि महत्त्वाच्या घडामोडींचे प्रत्येक अपडेट मिळवा एकाच ठिकाणी. राज्याच्या कानाकोपऱ्यात कुठे काय घडतंय, जाणून घ्या सर्व महत्त्वाच्या बातम्या आणि लाईव्ह अपडेट्ससह.

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update
Live Update

LIVE NEWS & UPDATES

  • 26 Oct 2026 10:38 AM (IST)

    मुलुंड ते ठाणेदरम्यान मध्य रेल्वेची वाहतूक 15 मिनिट उशिरा

    मुलुंड ते ठाणे दरम्यान रेल्वे उशिराने

    मुलुंडमध्ये ओवर हेड वायर कपडा अडकल्यामुळे वाहतूक उशिराने

    मध्य रेल्वेची वाहतूक 10/15 मिनिट उशिरा

    प्रवासी रेल्वे ट्रॅकवर उतरले

  • 26 Oct 2026 10:34 AM (IST)

    पुण्यात भरदिवसा कोयता फिरवून दहशत पसरवण्याचा प्रयत्न

    ताडीवाला रोड परिसरातील युवकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

    सार्वजनिक ठिकाणी हातात धारदार कोयता घेऊन फिरत असल्याचे व्हिडिओत दिसत असल्याची माहिती

    भरदिवसा घडलेल्या कथित प्रकारामुळे परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

    व्हायरल व्हिडिओमुळे ताडीवाला रोड परिसरात चर्चेला उधाण

    व्हिडिओतील प्रकार नेमका कधी घडला, याबाबत अद्याप स्पष्टता नाही

    या प्रकरणी पोलिसांकडून पुढील कारवाईबाबत माहिती मिळण्याची प्रतीक्षा

  • 26 Oct 2026 09:52 AM (IST)

    मनसे नेते संदीप देशपांडे आज कर्जत दौऱ्यावर

    कर्जतमधील ग्रामस्थ आणि मनसे पदाधिकाऱ्यांसोबत घेणार बैठक

    २८ ऑक्टोबर रोजी राज ठाकरे यांच्या सभेपूर्वी बैठकीचं आयोजन

    कर्जतमधील शेळके हॉलमध्ये आज संध्याकाळी होणार बैठक

    टोरेंट जलविद्युत प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर संदीप देशपांडे यांचा कर्जत दौरा

    टोरेंट प्रकल्पाला होणाऱ्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व

    राज ठाकरे यांच्या सभेपूर्वी मनसेकडून जोरदार तयारी

  • 26 Oct 2026 09:26 AM (IST)

    खेडमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ! वेरळमध्ये दोन बंगले फोडले; रत्नागिरीहून श्वानपथक दाखल

    रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये चोरट्यांनी एकाच रात्री शेजारील दोन बंगले फोडल्याने खळबळ उडाली आहे. वेरळ येथील समर्थ कृपा विश्व परिसरातील सूरज शेट्टी आणि प्रसन्न शरद चांदुगडे यांच्या बंगल्यांना चोरट्यांनी लक्ष्य केले. शेट्टी यांच्या घरातून सोन्या-चांदीचे दागिने, रोकड आणि दोन इम्पोर्टेड घड्याळे चोरीला गेल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच खेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तर तपासासाठी रत्नागिरीहून श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. श्वानपथकाने मुख्य प्रवेशद्वारापासून सर्व्हिस रोडपर्यंत माग काढला असून चोरट्यांचा शोध सुरू आहे.

  • 26 Oct 2026 09:25 AM (IST)

    दुर्गा टेकडी येथे होणाऱ्या वेस्ट एनर्जी प्रकल्प विरोधात नागरिक आक्रमक

    पिंपरी चिंचवड शहरातील दुर्गा टेकडी परिसरात होणाऱ्या वेस्ट एनर्जी प्रकल्पाला रावेत निगडी परिसरातील नागरिकांनी तीव्र विरोध केला आहे. दुर्गा टेकडी परिसरात वेस्ट एनर्जी प्रकल्प ऐवजी स्वर्गीय लोकनेते अजित पवार ऑक्सिजन पार्क उभारण्याची मागणी रावेत निगडी प्राधिकरण येथील रहिवाशांनी केली आहे. दुर्गा टेकडी वाचविण्यासाठी हजारो नागरिकांनी रस्त्यावर उतरून पिंपरी चिंचवड महापालिकेचा विरोध केला आहे. दुर्गा टेकडी परिसरात वेस्ट एनर्जी प्रकल्प आल्यास या भागातील नागरिकांना गंभीर आजारांच्या समस्यांना तोंड द्यावं लागणार आहे. तसेच या भागातील झाडांची कत्तल होऊन हवा प्रदूषित होणार आहे. त्यामुळे या ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेने वेस्ट एनर्जी प्रकल्प उभारणे ऐवजी, ऑक्सीजन पार्क उभाराव अशी मागणी रावेत निगडी प्राधिकरण परिसरातील नागरिकांनी केली.

  • 26 Oct 2026 09:21 AM (IST)

    महाराष्ट्रात SIR अंतर्गत मतदार यादीतील दावे-हरकती नोंदवण्यासाठी आज अंतिम मुदत

    प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र नागरिकांना Form 6 भरून नाव नोंदवण्याची संधी.

    मतदार यादीतील नाव किंवा पत्त्यातील दुरुस्तीसाठी Form 8.

    नाव समाविष्ट करण्यास हरकत घेण्यासाठी Form 7.

    दावे-हरकतींची छाननी आणि निकाली काढण्याची प्रक्रिया 10 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होणार.

    महाराष्ट्राची अंतिम मतदार यादी 16 नोव्हेंबर 2026 रोजी प्रसिद्ध होणार.

  • 26 Oct 2026 08:47 AM (IST)

    500 कोटींच्या कथित व्यवहाराप्रकरणी संजय राऊत यांचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र

    महाराष्ट्राच्या राजकारणात 500 कोटींच्या कथित व्यवहारावरून मोठी खळबळ. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिलं आहे. या कथित व्यवहाराची ईडी आणि महाराष्ट्र पोलिसांमार्फत चौकशी करून पीएमएलएअंतर्गत कारवाई करण्याची मागणी राऊत यांनी केली आहे. 500 कोटी रुपये कुणी दिले, कुणाला दिले आणि पैसे जरांगे पाटील यांच्यापर्यंत पोहोचले नसतील, तर ते गेले कुठे? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

  • 26 Oct 2026 08:44 AM (IST)

    सिडकोतील पिस्तूल तस्करीचे नेटवर्क उद्ध्वस्त; 8 आरोपी अटकेत, 7 पिस्तूल आणि 20 काडतुसे जप्त

    छत्रपती संभाजीनगरमध्ये गुन्हेगारी जगतात वर्चस्व निर्माण करण्यासाठी उच्चशिक्षित तरुणांनी पिस्तूल तस्करीत सहभाग घेतल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात सिडको पोलिसांनी कारवाई करत तस्करीचे नेटवर्क उद्ध्वस्त केले असून, आतापर्यंत 8 आरोपींना अटक करण्यात आली आहे. सुरुवातीला 6 आरोपींकडून 4 पिस्तूल आणि 11 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली होती. आरोपींच्या चौकशीत तीन पिस्तूल आणि 9 जिवंत काडतुसे दोन व्यावसायिकांना दीड लाख रुपयांना विकल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी शुभम धर्मराज वाळके आणि कृष्णा विष्णू अधाने या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून विक्रीसाठी दिलेली पिस्तूल आणि काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. या कारवाईत आतापर्यंत एकूण 7 पिस्तूल आणि 20 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. सिडकोचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल येरमे यांनी ही माहिती दिली.

  • 26 Oct 2026 08:42 AM (IST)

    मुंबई - गोवा महामार्गावर खारपाडा टोलनाका येथे जोरदार राडा

    प्रवासी आणि टोल कर्मचाऱ्यांमध्ये हाणामारी

    टोल देण्याच्या वादातून हा राडा झाल्याची माहिती

    रात्रीच्या सुमारास झालेल्या हाणामारीत बसची काच फुटल्याची माहिती

    हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

  • 26 Oct 2026 08:10 AM (IST)

    मुंबईत उभारणार जागतिक दर्जाचे मरीना; व्हिक्टोरिया डॉक येथे 923 कोटींचा प्रकल्प उभारणार

    मुंबईत उभारणार जागतिक दर्जाचे मरीना; व्हिक्टोरिया डॉक येथे 923 कोटींचा प्रकल्प उभारणार. मुंबईत जागतिक दर्जाचे मरीना उभारण्यासाठी मुंबई बंदर प्राधिकरणाने जागतिक निविदा प्रसिद्ध. व्हिक्टोरिया डॉक येथे 'विकसित भारत मुंबई मरीना' हा प्रकल्प उभारण्यात येणार. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी सुमारे 923 कोटी रुपये खर्च अपेक्षित. इच्छुक कंपन्यांना 15 डिसेंबर 2026 पर्यंत निविदा सादर करता येणार. मरीना प्रकल्पामुळे मुंबईतील समुद्री पर्यटनाला चालना मिळण्याची अपेक्षा. हा प्रकल्प बांधा, वित्तपुरवठा करा, चालवा आणि हस्तांतरित करा (डीबीएफओटी) या तत्त्वावर राबविण्यात येणार. त्यासाठी 45 वर्षांची कंत्राट मुदत निश्चित करण्यात आली.

  • 26 Oct 2026 07:44 AM (IST)

    धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा पुन्हा पेटणार, 1 डिसेंबरला अहिल्यानगर शहरात महामोर्चा

    धनगर समाजाच्या प्रलंबित आरक्षणासाठी समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. या प्रश्नावर अहिल्यानगर येथे 1 डिसेंबर रोजी भव्य महामोर्चा काढण्याचा आणि मेळाव्यातून सरकारला अल्टिमेटम देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. आरक्षणाचा प्रश्न तब्बल 80 वर्षांपासून प्रलंबित आहे. 2014 मध्ये सत्तेवर आल्यास प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते. मात्र, 12 वर्षे लोटूनही परिस्थिती ‘जैसे थे’ असल्याने भाजपा सरकारबद्दल तीव्र नाराजी पसरली आहे. संविधानिक हक्कासाठी मराठवाड्यानंतर आता पश्चिम व उत्तर महाराष्ट्रात आंदोलनाचा विस्तार करत व्यापक लढा उभारण्याचा निर्धार नेत्यांनी व्यक्त केला आहे.

  • 26 Oct 2026 07:42 AM (IST)

    गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्यातील राजगुडा गावासह 5 गावांमध्ये दारूबंदीसाठी महिलांचा एल्गार

    गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील राजगुडा ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या राजगुडा, सलंगटोला, मंदीटोला, मोठा मोगरा आणि लहान मोगरा या पाच गावांत दारूबंदीच्या जनजागृतीसाठी रॅली काढण्यात आली. महिला बचत गटांच्या सदस्यांसह ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, ग्रामस्थ आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत दारूबंदीचा संदेश दिला. सुमारे 2 हजार 500 लोकसंख्या असलेल्या या 5 गावांत दारूबंदीचा विषय ऐरणीवर आला आहे. गावांतील काही दुकानदारांकडून दारूविक्री होत असल्याच्या पार्श्वभूमीवर महिलांनी एकजूट दाखवत जनजागृतीचा पुढाकार घेतला.

  • 26 Oct 2026 07:37 AM (IST)

    महामेट्रोला 19 व्या ‘अर्बन मोबिलिटी इंडिया’ परिषदेत ‘सर्वोत्कृष्ट प्रदर्शक’ पुरस्कार

    महामेट्रोला 19 व्या ‘अर्बन मोबिलिटी इंडिया’ परिषदेत ‘सर्वोत्कृष्ट प्रदर्शक’ पुरस्कार. केंद्रीय मंत्री मनोहर लाल यांच्या हस्ते महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी स्वीकारला पुरस्कार. ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथे आयोजित राष्ट्रीय परिषदेत महामेट्रोचा गौरव. महामेट्रोकडून डिजिटल प्रोजेक्ट मॅनेजमेंट, प्रवासी सुरक्षा आणि ‘वन ॲप’ यांसारख्या अत्याधुनिक प्रणालींचे सादरीकरण. 2047 पर्यंत भारतातील 80 कोटी नागरिक शहरांमध्ये राहतील. सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारण्याची केंद्रीय मंत्री मनोहर लाल यांची भूमिका. भारतात सध्या सुमारे 1,185 किलोमीटरचे मेट्रो जाळे कार्यरत.

  • 26 Oct 2026 07:30 AM (IST)

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक दौऱ्यावर

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक दौऱ्यावर. त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शन घेऊन साधू-महंतांशी आगामी कुंभमेळ्याच्या तयारीसंदर्भात करणार चर्चा. ‘भगवा खांद्यावर, शिवसैनिक बांधावर’ या उपक्रमाची नाशिकमधून सुरुवात. हरसूल येथे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आनंदाचा शिधा वाटप करणार. हरसूल परिसरातील १० हजार शेतकऱ्यांना आनंदाचा शिधा वाटप करण्याचे नियोजन. जिल्हाधिकारी कार्यालयात आगामी कुंभमेळ्याच्या कामांचा घेणार आढावा. नाशिकमधील वाहतूक कोंडीवर उपाययोजना. गंगापूर रोडला समांतर रस्त्याचे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन. गेल्या काही महिन्यांपासून कुंभमेळ्यांच्या कामापासून दूर राहणारे एकनाथ शिंदे आज आढावा घेणार असल्याने या दौऱ्याकडे लक्ष.

  • 26 Oct 2026 07:29 AM (IST)

    गोवंश तस्करीचा पर्दाफाश; 30 लाख 65 हजारांचा मुद्देमाल जप्त

    छत्रपती संभाजीनगरमध्ये कत्तलीच्या उद्देशाने बंद कंटेनरमधून गोवंशांची अवैध वाहतूक होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शहर गुन्हे शाखेने जालना रोडवरील केंब्रिज चौक परिसरात कारवाई करत २९ गोवंशांची सुटका केली असून, तीन आरोपींना ताब्यात घेतलं आहे. या कारवाईत कंटेनरसह सुमारे 30 लाख 65 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम आणि प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणात एकूण सहा आरोपींचा उल्लेख असून, उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.

  • 26 Oct 2026 07:27 AM (IST)

    आज अभिनेता इम्रान खान याने देश सोडून जायचे का? या प्रकरणावर उच्च न्यायालयात सुनावणी

    अभिनेता इमरान खान सीजेपी च्या समर्थनार्थ मुंबईत पुकारलेल्या आंदोलनासाठी आला होता. यावेळी पोलिसांनी काही वेळ त्याला ताब्यात घेतले आणि सोडून दिले. मात्र त्यानंतर इम्रान खान हा भारतीय नागरिक नसून ते अमेरिकन नागरिक आहे त्यामुळे त्याने 28 ऑक्टोबरपर्यंत देश सोडून जावे अशी नोटीस मुंबई पोलिसांनी दिली होती. त्यानंतर इमरान खान यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. या संदर्भात उच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार.

  • 26 Oct 2026 07:26 AM (IST)

    घाटकोपर खंडोबा टेकडीच्या सुशोभीकरणासाठी 5 कोटींहून अधिकचा निधी

    मुंबईतील घाटकोपर पश्चिम येथील पुरातन खंडोबा टेकडी परिसराचा विकास आणि सुशोभीकरण करण्यासाठी मुंबई महापालिकेने 5 कोटी 79 लाख 89 हजार रुपयांचा खर्चाचा प्रस्ताव तयार केला आहे. 'एन' विभागातील जय मल्हार सहायक्य कमिटी आणि खंडोबा मंदिर देवस्थान समितीच्या सदस्यांनी पुरातन खंडोबा मंदिर व डोंगर परिसराच्या विकासाची मागणी केली होती. त्यानुसार महापालिका अधिकाऱ्यांनी स्थळपाहणी करून विकासकामांचे अंदाजपत्रक तयार केले. या कामासाठी कंत्राटदार कंपनीची निवड करण्याची शिफारस करण्यात आली असून, कंत्राटदाराने कार्यालयीन अंदाजापेक्षा 3.33 टक्के कमी दराने निविदा सादर केली आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर ठेवण्यात आला आहे.

  • 26 Oct 2026 07:24 AM (IST)

    तळोजा, नवी मुंबई येथे गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन आरोपी पुणे पोलिसांकडून ताब्यात

    आंबेगाव पोलीस ठाण्याच्या तपास पथकाची कारवाई; दत्तनगर परिसरातून तिघांना घेतले ताब्यात

    तळोजा येथील शिवाजी चौकाजवळ मारवा बिल्डिंगच्या खाली २४ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १ वाजून १७ मिनिटांच्या सुमारास घडली होती गोळीबाराची घटना

    आर्थिक व्यवहाराच्या वादातून फिर्यादीला मारहाण करून पिस्तूलमधून गोळीबार केल्याचा आरोपींवर आरोप

    गोळीबारात फिर्यादी गंभीर जखमी; जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

    रुद्र दादासाहेब बारवकर (वय १९), अनिकेत प्रताप नरवडे (वय १९) आणि सौरभ गोरख चौधरी (वय २४) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे

    आरोपी दत्तनगर परिसरात असल्याची आंबेगाव पोलिसांना मिळाली होती गोपनीय माहिती

    पोलीस अंमलदार धनाजी धोत्रे आणि सचिन गाडे यांच्या माहितीच्या आधारे तपास पथकाने सापळा रचून तिघांना घेतले ताब्यात

    पुढील कारवाईसाठी तिन्ही आरोपींना नवी मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले.

  • 26 Oct 2026 07:22 AM (IST)

    तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी मुंबईत दाखल

    तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी मुंबईत दाखल. आंतरराज्यीय वादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेणार भेट. मुंबईतील विमानतळावर काल रेवंत रेड्डी यांचे आगमन. आज सकाळी 11 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर बैठक होणार. तुम्मिडीहट्टी बॅरेजच्या प्रस्तावावर बैठकीत चर्चा होणार. बॅरेजसाठी महाराष्ट्राच्या संमतीसाठी तेलंगणा सरकारचे प्रयत्न. 152 मीटर पूर्ण जलसाठा पातळीवर (FRL) बॅरेज उभारण्याचा तेलंगणाचा प्रस्ताव. महाराष्ट्राची भूमिका काय असणार? बैठकीकडे लक्ष. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व प्राप्त.

  • 26 Oct 2026 07:16 AM (IST)

    चौकशी पूर्वीच राणा सूर्यवंशीने रुग्णालयातून ठोकली धूम

    बारामतीमध्ये सूर्यवंशी याच्यावर झालेल्या "कथित हल्ला" प्रकरणात चौकशी पूर्वीच राणा पसार. राणा शिपिंग कंपनीचा चालक व व्यावसायिक राणा सूर्यवंशी हा पोलिसांच्या पुढील चौकशीपूर्वीच पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयातून धूम ठोकून पसार. त्याच्या शोधासाठी काही पोलिसांनी फिरवली चक्रे. हल्ला प्रकरणात कटात सहभागी असलेल्या राणा सूर्यवंशीच्या निकटवर्तीयांवर व साथीदारांवर बारामती पोलिसांनी गुन्हे दाखल. 18 ऑक्टोबर रोजी बारामती विमानतळानजीक आपल्यावर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केल्याची तक्रार राणा सूर्यवंशी याने बारामती पोलिसांकडे दिली होती.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number