Chembur Accident : चेंबूरमध्ये मोठी दुर्घटना!इमारतीच्या 8 व्या मजल्यावरून पडले 6 कामगार

जखमींना सध्या मुंबईतील राजावडी रुग्णालयात दाखल केलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Chembur Accident : चेंबूरमध्ये मोठी दुर्घटना!इमारतीच्या 8 व्या मजल्यावरून पडले 6 कामगार

चेंबुरमध्ये एका इमारतीचं बांधकाम सुरू असताना सहाव्या मजल्यावरून सहा कामगार पडले.  या सहा जणांनापैकी एकाचा जागीच मृत्यू झाला असून इतर पाच जणं गंभीर जखमी आहेत. जखमींना सध्या मुंबईतील राजावडी रुग्णालयात दाखल केलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

समोर आलेल्या माहीतीनुसार, सुभाषनगरमधील इमारत क्रमांक 36मध्ये ही घटना शनिवारी दुपारी 12 वाजून 5 मिनिटांनी घडली आहे. बांधकाम सुरू असताना कामगारांनी सेफ्टी किट न वापरल्यामुळे ते पडले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. 

अपघात होताच परिसरातील नागरिकांनी आणि इतर सहकाऱ्यांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. जखमी झालेल्या सहाही कामगारांना तात्काळ घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी काही कामगारांची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतं. घटनेची माहिती पोलिसांना दिली आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number