Saturday, June 06, 2026 10:13:41 AM

Pune Bhor Nasrapur Case Update:'ही मारामारीची किरकोळ केस, त्यात मला गोवण्यात आलंय...', नसरापूर प्रकरणातील नराधमाचं धक्कादायक उत्तर, काय घडलं न्यायालयात?

या प्रकरणी 65 वर्षीय आरोपीला पुणे न्यायालयाने 7 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. विशेष न्यायाधीश एम. जी. चव्हाण यांच्यासमोर ही सुनावणी पार पडली.

pune bhor nasrapur case updateही मारामारीची किरकोळ केस त्यात मला गोवण्यात आलंय नसरापूर प्रकरणातील नराधमाचं धक्कादायक उत्तर काय घडलं न्यायालयात

पुण्यातील भोर येथील नसरापूर येथील चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिला दगडाने ठेचून निर्घृणपणे संपवलं. या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटले. या प्रकरणी 65 वर्षीय आरोपीला पुणे न्यायालयाने 7 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. विशेष न्यायाधीश एम. जी. चव्हाण यांच्यासमोर ही सुनावणी पार पडली. 

काय म्हणाला नराधम आरोपी?  
समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपीने स्वतःला वाचवण्यासाठी न्यायालयात एक धक्कादायक बनाव रचला, मात्र पोलिसांनी कडक युक्तिवाद केल्यानंतर त्याचा पोलीस कोठडी सुनावण्यात आली.  पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर, "तुमची नेमकी काय केस आहे माहिती आहे का?" असे न्यायाधीशांनी विचारले. यावर आरोपीने अत्यंत निर्लज्जपणे उत्तर देत, "सर ही मारामारीची किरकोळ केस आहे त्यात मला गोवण्यात आलं आहे", असं नराधम आरोपीने दिले उत्तर दिलं. 

या आधीही आरोपीवर गुन्हे दाखल होते 
 या प्रकरणातील आरोपी भीमाजी कांबळे हा आधीपासूनच विकृत आणि गुन्हेगारी मानसिकतेचा असल्याचे समोर आले आहे. त्याने याआधी देखील दोन गुन्हे केले आहेत. ज्यातून त्याची सुटका झाली होती. आरोपी भीमाजी कांबळे याच्यावर याआधी दोन गुन्हे दाखल होते. आरोपी भीमाजी कांबळेची या दोन्ही गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता झाली होती. पुराव्याअभावी आरोपी भीमाजी कांबळेची दोन्ही गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता झाली होती. 2015 ला त्याने विनयभंग आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याच प्रकरणी त्याची निर्दोष मुक्तता झाली होती. दरम्यान हा आरोपी 4 वर्षाच्या चिमुकलीवरील अत्याचारा प्रकरणी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.


चिमुरडीच्या वडीलांनी व्यक्त केला संताप 
यावेळी पीडितेचे वडील म्हणाले की, "नमस्कार मी पीडितेचा वडील, आता मी अस्थी विसर्जनासाठी देहू येथे आलो असताना... माझ्या घरच्यांकडून माझ्यासाठी फोन आला मित्रांचा की, तिथे बरेच राजकारणी लोकं सांत्वन करायला किंवा भेटायला येत आहेत. तर माझी आणि माझ्या कुटुंबाची एकच इच्छा आहे की, जोपर्यंत माझ्या मुलीला योग्य तो न्याय मिळत नाही, त्या नराधमाला जोपर्यंत फाशी होत नाही, तोपर्यंत एकाही राजकारण्याने आमच्या घरी आम्हाला भेटायला येऊ नये... एवढी माझी नम्र विनंती आहे... जेव्हा त्या नराधमाला फाशी होईल तेव्हाच राजकारणी आणि ज्यांना कोणाला आम्हाला भेटायचं आहे त्यांना आम्ही भेटू... जोपर्यंत त्या नराधमाला फाशी होत नाही, तोपर्यंत कोणत्याच राजकारणाने माझ्या घरी माझं सांत्वन करायला येऊ नये..."


सम्बन्धित सामग्री