NEET Paper Leak Case: नीट पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; भौतिकशास्त्राचे प्रश्न लीक केल्याप्रकरणी पुण्यातून आणखी एका महिला मास्टमाइंडला अटक

पुण्यातून मनीषा संजय हवालदार या महिला आरोपीला अटक करण्यात आली असून, भौतिकशास्त्राचे प्रश्न लीक होण्यामागील तीच मुख्य स्रोत असल्याचा आरोप तपास यंत्रणेने केला आहे.

NEET Paper Leak Case: नीट पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; भौतिकशास्त्राचे प्रश्न लीक केल्याप्रकरणी पुण्यातून आणखी एका महिला मास्टमाइंडला अटक

NEET Paper Leak Case: देशातील सर्वात मोठ्या वैद्यकीय प्रवेश परीक्षांपैकी एक असलेल्या NEET-UG 2026 पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) आणखी एक महत्त्वाची अटक केली आहे. पुण्यातून मनीषा संजय हवालदार या महिला आरोपीला अटक करण्यात आली असून, भौतिकशास्त्राचे प्रश्न लीक होण्यामागील तीच मुख्य स्रोत असल्याचा आरोप तपास यंत्रणेने केला आहे. मनीषा हवालदार पुण्यातील ‘सेठ हिरालाल सराफ प्रशाला’मध्ये कार्यरत होती.

CBI च्या माहितीनुसार, मनीषा हवालदारने शेअर केलेल्या प्रश्नांची तुलना NEET-UG 2026 च्या मूळ भौतिकशास्त्र प्रश्नपत्रिकेशी करण्यात आली असता दोन्हीमध्ये साम्य आढळून आले. याच आधारे तपास यंत्रणेने तिला या संपूर्ण पेपरफुटी रॅकेटमधील एक महत्त्वाचा दुवा मानले आहे. तपासात असेही समोर आले आहे की, नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) कडून परीक्षा प्रक्रियेसाठी तिची ‘तज्ज्ञ’ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे तिला प्रश्नपत्रिकांपर्यंत थेट प्रवेश उपलब्ध होता. CBI च्या तपासानुसार, एप्रिल 2026 मध्ये मनीषा हवालदारने भौतिकशास्त्राशी संबंधित अनेक प्रश्न सह-आरोपी मनीषा मांढरे हिच्यासोबत शेअर केले होते. मनीषा मांढरेला यापूर्वीच 16 मे 2026 रोजी अटक करण्यात आली होती. या प्रकरणाच्या तपासादरम्यान CBI ने देशभरातील विविध शहरांमध्ये छापे टाकून अनेक महत्त्वाची कागदपत्रे, लॅपटॉप, मोबाईल फोन आणि बँक व्यवहारांचे तपशील जप्त केले आहेत.

कागदपत्रांची फॉरेन्सिक तपासणी सुरू
या रॅकेटचा संपूर्ण विस्तार उघड करण्यासाठी जप्त करण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांची आणि कागदपत्रांची फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे. CBI ने स्पष्ट केले की, शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाकडून प्राप्त झालेल्या लेखी तक्रारीनंतर 12 मे 2026 रोजी हे प्रकरण नोंदवण्यात आले होते. त्यानंतर विशेष तपास पथके तयार करून देशभरात कारवाई सुरू करण्यात आली.

आतापर्यंत एकूण 11 आरोपींना अटक 
या प्रकरणात आतापर्यंत एकूण 11 आरोपींना अटक करण्यात आली आहे. दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर यांसारख्या शहरांमध्ये ही कारवाई करण्यात आली. तपासात असेही उघड झाले आहे की, काही मध्यस्थ विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये घेऊन त्यांना विशेष कोचिंग क्लासेसमध्ये पाठवत असत, जिथे परीक्षेत येणारे कथित प्रश्न आधीच पुरवले जात होते.

हेही वाचा – Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा संशयास्पद मृत्यू प्रकरणात मोठी घडामोड; फरार पती समर्थ सिंग जबलपूर कोर्टात शरण

आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता 
CBI च्या मते, या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या अनेक मध्यस्थांची ओळख पटली असून, ते पालक आणि विद्यार्थ्यांकडून मोठी रक्कम उकळून प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्याचा दावा करत होते. या संपूर्ण प्रकरणाचा तपास अजूनही सुरू असून, पेपरफुटीमागील संपूर्ण साखळी उघड करण्यासाठी तपास यंत्रणा वेगाने काम करत आहे. प्राथमिक तपासात प्रश्नपत्रफुटीचा मूळ स्रोत शोधण्यात यश आल्याचा दावा CBI ने केला असून, आगामी काळात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number