Mumbai airport gold 5 crore DIR : मुंबई विमानतळावर DRI कडून सोने तस्करीचा पर्दाफाश; 5 कोटींचं सोनं जप्त, विमानतळ कर्मचाऱ्यांच्या मदतीने चालत होतं रॅकेट

DRI च्या ‘ऑपरेशन गोल्डन नेक्सस’ अंतर्गत मुंबई विमानतळावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सुवर्ण तस्करी रॅकेटचा पर्दाफाश केला गेला आहे.

Mumbai airport gold 5 crore DIR : मुंबई विमानतळावर DRI कडून सोने तस्करीचा पर्दाफाश; 5 कोटींचं सोनं जप्त, विमानतळ कर्मचाऱ्यांच्या मदतीने चालत होतं रॅकेट

DRI च्या ‘ऑपरेशन गोल्डन नेक्सस’ अंतर्गत मुंबई विमानतळावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सुवर्ण तस्करी रॅकेटचा पर्दाफाश केला गेला आहे. यावेळी तब्बल 5 कोटी रुपये किमतीचे 3.2 किलो परदेशी बनावटीचे 24 कॅरेट सोने जप्त केले असून जप्त केलेले सोने वॅक्स (मेण) स्वरूपातील सोन्याची धूळ असल्याचे निष्पन्न झाले आहे.

या संदर्भात एकूण 7 जणांना अटक करण्यात असून अटक आरोपींमध्ये 3 बांगलादेशी व श्रीलंकन ट्रान्झिट प्रवाशांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. तसेच या सर्व प्रकरणात 3 विमानतळ कर्मचारी आणि 1 स्थानिक रिसिव्हरचाही समावेश असल्याचे देखील उघड झाले आहे. 

गुप्त माहितीच्या आधारे DRI ने सापळा रचून ही कारवाई केली असून सीमाशुल्क कायदा 1962 अंतर्गत सोने जप्त केले आहे. दोन बस/कोच चालक आणि एका कोच मॉनिटरला सोने बाहेर नेताना पकडले. यावेळी तस्करांनी सोने शरीरात लपवून भारतात आणल्याचे उघड झाले आहे. कारवाईत संपूर्ण तस्करी साखळी उद्ध्वस्त करण्यात DRI ला यश आले असून सुवर्ण तस्करीविरोधातील DRI ची प्रभावी गुप्तचर आणि अंमलबजावणी क्षमता पुन्हा सिद्ध झाली आहे. याप्रकरणी, अधिक तपास सुरू असून हे सोनं नेमकं कुठे जाणार होतं, कुठून आलं होतं याबाबत सखोल चौकशी सुरू आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number