Pune Accident : ब्रेक फेल झाला अन् काही क्षणांतच घडलं भयंकर; पहाटे नवले पुलाजवळ मोठा अपघात, एकाचा मृत्यू

पुण्यातील नवले पुलाजवळ असलेल्या भूमकर पुलावर पहाटेच्या सुमारास तीन मालवाहू ट्रकचा मोठा अपघात झाल्याची घटना समोर आलेली आहे.

Pune Accident : ब्रेक फेल झाला अन् काही क्षणांतच घडलं भयंकर; पहाटे नवले पुलाजवळ मोठा अपघात, एकाचा मृत्यू

पुणे : पुण्यातील नवले पुलाजवळ असलेल्या भूमकर पुलावर पहाटेच्या सुमारास तीन मालवाहू ट्रकचा मोठा अपघात झाल्याची घटना समोर आलेली आहे.  जिथं एका मालवाहू ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे. या अपघाताच्या घटनेमुळे परिसरात पहाटे काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.

क्षणांत होत्याचं नव्हतं झालं
मिळालेल्या माहितीनुसार, भूमकर पुलावरुन मालवाहू ट्रक हा जात असताना अचानकच ट्रकचे ब्रेक हे निकामी झाले, त्यामुळेच चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि ट्रक पुढे असलेल्या ट्रकला जाऊन जोरात धडकला. याच धडकेनंतर पुढील ट्रकही दुसऱ्या ट्रकला धडकला होता, अशा प्रकारे तब्बल तीन ट्रक हे एकमेकांवर आदळले. अपघाताची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी मदतकार्य सुरु करण्यात आले. घडलेल्या या अपघातात काहीजण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती सध्या समोर येत आहे. या सर्व जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरु आहेत.

हेही वाचा-Jalgaon: जळगावात खळबळजनक घटना! गिरणा नदीत महिलेची उडी, शोध सुरू

दरम्यान, पुलावर झालेल्या या अपघातामुळे वाहतुकीवरही परिणाम झाला होता. अपघाताग्रस्त वाहने ही रस्त्यावर आल्याने काही वेळासाठी अन्य वाहनांचा वेग कमी झाला होता. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून सर्व परिस्थिती नियंत्रणात आणली. या अपघाताचा पुढील तपास पुणे पोलीस करत असून, तपासानंतर अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होईल.

दुर्देवाने एकाचा मृत्यू
आज पहाटे पुण्यातील भूमकर पुलावर भीषण अपघात घडला होता. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ब्रेक फेल झाल्याने मालवाहू ट्रक पुढील ट्रकला धडकला असे तब्बल एकामागून एक तीन मालवाहू ट्रक एकमेकांना धडकले होते. अपघातानंतर यातील जखमींना तातडीने रुग्णालायत पुढील उपचारासाठी दाखल केले होते. मात्र त्यातील एकाचा मृत्यू झाल्याची माहिती सध्या मिळत आहे. ब्रेक फेल होण्याचे नेमके कारण आणि अपघाताची पुढील माहिती तपासानंतर स्पष्ट होईल.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number