Ketan Agrawal Case : केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणी पहिल्याच सुनावणीत धक्कादायक खुलासे समोर; आरोपीच्या वकिलांचे खळबळजनक दावे, तर केतनच्या वकिलांचा युक्तिवाद

केतनची भावी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन यांची पहिली पोलीस कोठडी संपल्याने त्यांना पुन्हा पुणे न्यायालयात हजर करण्यात आले होते.

Ketan Agrawal Case : केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणी पहिल्याच सुनावणीत धक्कादायक खुलासे समोर; आरोपीच्या वकिलांचे खळबळजनक दावे, तर केतनच्या वकिलांचा युक्तिवाद

Ketan Agrawal Case: केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणाने महाराष्ट्रात मोठी खळबळ उडवून दिली आहे. या खटल्यातील मुख्य आरोपी, केतनची भावी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन यांची पहिली पोलीस कोठडी संपल्याने त्यांना पुन्हा पुणे न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर आरोपींच्या पोलीस कोठडीत 3 जुलैपर्यंत वाढ केली आहे. पोलिसांनी तपासाच्या पूर्वतयारीसाठी 7 दिवसांची कोठडी मागितली होती, परंतु कोर्टाने 5 दिवसांची मंजुरी दिली.

सियाच्या वकिलांचा कोर्टात दावा
सुनावणी दरम्यान सियाचे वकील विपुल दुष्यंत यांनी न्यायालयात पोलिसांच्या तपासावर आणि अटकेच्या कायदेशीरतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, "ही अटक पूर्णपणे बेकायदेशीर आहे. दरीत कोसळल्यामुळे केतनचा मृत्यू झाला आहे, त्याला हत्या म्हणता येणार नाही. केवळ पालकांच्या आरोपांवरून या घटनेला गुन्ह्याचे स्वरूप दिले जात आहे." सर्व तांत्रिक तपास आणि रिक्रिएशन आधीच पूर्ण झाले असल्याने आता पोलीस कोठडीची कोणतीही आवश्यकता नसल्याचा युक्तिवाद त्यांनी केला.

दरम्यान, सरकारी वकिलांनी आणि पोलिसांनी कोठडी वाढवून मिळण्यासाठी न्यायालयात अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले. पोलिसांच्या मते, आरोपींनी केतनच्या हत्येचा कट रचल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपींना इंडोनेशियातील बाली येथे प्री-वेडिंग शूटसाठी जायचे नव्हते, म्हणूनच त्यांनी पासपोर्ट फाडले होते.केतनचा मूळ पासपोर्ट अद्याप शोधायचा आहे. याशिवाय, आरोपींनी लोहगडावर आधी जाऊन रेकी केली होती का? या कटात आणखी कोणाचा सहभाग आहे का? आणि केतनच्या मोबाईलमधील डिलीट केलेली माहिती कशी रिकव्हर करायची, याचा तपास करायचा आहे. सियाप्रमाणेच आता चेतनलाही घटनास्थळी नेऊन गुन्ह्याचे नाट्यरूपांतरण करायचे असल्याचे पोलिसांनी सांगितले.

तथापि, चेतनच्या वकिलांनी पोलिसांच्या मागणीला कडाडून विरोध केला. त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, "पोलीसांनी यापूर्वीच हुडी, मोबाईल आणि गाडी जप्त केली आहे, मग फक्त पॅन्ट जप्त करण्यासाठी नवीन कस्टडीची काय गरज? आम्ही स्वतःहून सर्व सहकार्य करत आहोत." चेतनचे नाव प्रथम माहिती अहवालात (FIR) केवळ दोनच वेळा आले असून, तपासाच्या नावाखाली पोलीस केवळ वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप वकिलांनी केला.

सीसीटीव्ही आणि पूर्वनियोजित कट; सरकारी वकिलांचा प्रतिवाद
सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले की, चेतन आणि सिया यांच्यात घनिष्ठ संबंध असल्याचे सिद्ध झाले आहे. घटनेपूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात आले असून, त्यामध्ये दोघे एकत्र चर्चा करताना दिसत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 मे, 4 जून आणि 14 जून रोजी देखील लोहगडावर केतनचा काटा काढण्याचा कट आखण्यात आला होता. चेतनने लोहगडावर येताना स्वतःचे तिकीट काढले नव्हते आणि तो नीरज नावाच्या कामगाराचा फोन घेऊन तिथे गेला होता, यावरून त्याचा पूर्वनियोजित कट स्पष्ट होतो, असा दावा सरकारी पक्षाने केला.

हेही वाचा – Ketan Agarwal Case: एक कोटी रुपये, 'कोडवर्ड' आणि मृत्यूचा कट! केतनच्या हत्येसाठी सियाने चेतनला दिले पैसे? हत्याकांडातील धक्कादायक रहस्य उघड

याशिवाय, आरोपींच्या वकिलांनी या प्रकरणाच्या 'मीडिया ट्रायल'वर तीव्र नाराजी व्यक्त केली. पंकज बन्सल आणि निमित भुता प्रकरणांचे दाखले देत त्यांनी ही अटक चुकीची असल्याचे कोर्टाला पटवून देण्याचा प्रयत्न केला. "सध्या या प्रकरणाची मोठ्या प्रमाणावर मीडिया ट्रायल सुरू आहे. कोर्टात माहिती पोहोचण्याआधीच ती माध्यमांकडे कशी जाते? मीडियाने सर्व काही आधीच दाखवून दिले असेल, तर पोलिसांचा तपास पूर्ण झाला आहे असेच म्हणावे लागेल," असा टोला वकिलांनी लगावला. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number