Twisha Sharma Case: ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट; पती समर्थ सिंगला 7 दिवसांची पोलीस कोठडी, बार कौन्सिलकडून परवाना रद्द

भोपाळमधील बहुचर्चित ट्विशा शर्मा हत्याकांडाच्या संदर्भात न्यायालयाने मुख्य आरोपी समर्थ सिंग याला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Twisha Sharma Case: ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट; पती समर्थ सिंगला 7 दिवसांची पोलीस कोठडी, बार कौन्सिलकडून परवाना रद्द

Twisha Sharma Case: भोपाळमधील बहुचर्चित ट्विशा शर्मा हत्याकांडाच्या संदर्भात न्यायालयाने मुख्य आरोपी समर्थ सिंग याला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. समर्थ सुरुवातीला 12 तारखेपासून फरार होता आणि त्याने शुक्रवारी जबलपूर उच्च न्यायालयात शरणागती पत्करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला भोपाळला जाण्याचे निर्देश देण्यात आले, ज्यानंतर पोलिसांनी त्याला न्यायालयाच्या आवारातूनच ताब्यात घेतले. शनिवारी त्याला दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले असता, पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करण्यासाठी कोठडीची मागणी केली. न्यायालयाने सर्व बाजूंचा विचार करून त्याला 1 आठवड्याची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. या कारवाईसोबतच बार कौन्सिलने समर्थचा वकिली करण्याचा परवानाही तात्काळ रद्द केला आहे.

दुसऱ्या शवविच्छेदनासाठी दिल्ली AIIMS चे 4 डॉक्टर भोपाळमध्ये दाखल होणार
ट्विशाच्या मृत्यूचे गूढ उकलण्यासाठी तिचे दुसरे शवविच्छेदन (Post-mortem) रविवारी करण्यात येणार आहे. ही अत्यंत संवेदनशील प्रक्रिया पार पाडण्यासाठी दिल्ली येथील 'एम्स' (AIIMS) मधील 4 तज्ज्ञ डॉक्टरांचे एक विशेष पथक आपली अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे घेऊन शनिवारी संध्याकाळी भोपाळकडे रवाना होणार आहे. या विशेष वैद्यकीय पथकाच्या अहवानानंतरच ट्विशाच्या मृत्यूचे नेमके कारण आणि वेळ स्पष्ट होऊ शकणार आहे.

माजी न्यायाधीश राजबाला सिंग यांच्या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी
या हत्याकांडातील दुसरी आरोपी आणि समर्थची आई, माजी न्यायाधीश राजबाला सिंग यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सोमवारी उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. कनिष्ठ न्यायालयाने त्यांना यापूर्वीच जामीन मंजूर केला होता, मात्र मध्य प्रदेश सरकारने या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. पीडितेचे वकील अंकुर पांडे यांनी सांगितले की, समर्थ गेल्या 10 दिवसांत कुठे राहिला आणि त्याला कोणी आश्रय दिला, याचा शोध पोलीस घेत आहेत. जर यामध्ये कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याचा सहभाग आढळला, तर त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच, आरोपीचा पासपोर्ट रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून तो न्यायालयात जमा करण्यात आला आहे. पुराव्यांच्या जतनाशी संबंधित अर्जांवर आता 29 तारखेला पुढील सुनावणी होईल.

जबलपूर न्यायालयात वकिलांच्या वेशातील गुंडांची धक्काबुक्की
आरोपी समर्थ सिंगला अटक करण्यापूर्वी जबलपूर न्यायालयाच्या कक्ष क्रमांक 32 मध्ये जे नाट्य घडले, त्यावर वकील अनुराग श्रीवास्तव यांनी गंभीर आक्षेप घेतले आहेत. त्यांनी सांगितले की, आरोपी तिथे वकिलांसाठी राखीव असलेल्या खुर्चीवर तोंडाला कापड बांधून आरामात बसला होता, जेव्हा वकिलांनी आणि प्रसारमाध्यमांनी त्याला ओळखले, तेव्हा वकिलांच्या वेशातील काही गुंडांनी माध्यम प्रतिनिधींना आणि वकिलांना बेदम मारहाण, शिवीगाळ आणि धक्काबुक्की करून आरोपीला पळवून नेण्याचा प्रयत्न केला. आरोपीला पिंजऱ्यात उभे करण्याऐवजी व्हीआयपी (VIP) वागणूक दिल्याबद्दल आणि पोलिसांच्या हलगर्जीपणाबद्दल आता संताप व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा – Crime News : धक्कादायक! 10 वर्षाच्या चिमुकलीचे अपहरण, अत्याचार करून तिला संपवलं; 24 तासानंतर तलावाजवळ आढळला मृतदेह

पीडित कुटुंबाकडून सीबीआय चौकशीची मागणी; स्थानिक एसएचओला हटवण्याची विनंती
तपास प्रक्रियेवर संशय व्यक्त करत वकील अंकुर पांडे यांनी सांगितले की, आरोपीला सुरुवातीपासूनच स्थानिक पोलिसांकडून संरक्षण मिळत होते. ज्या स्थानिक पोलीस ठाणे प्रमुखावर (SHO) निष्काळजीपणाचा आरोप आहे, त्यालाच विशेष तपास पथकाचा (SIT) सदस्य बनवण्यात आले आहे, त्यामुळे त्याला तात्काळ पदावरून हटवण्यात यावे अशी मागणी पीडितेच्या कुटुंबाने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. या प्रकरणाची सीबीआय (CBI) चौकशी करण्यासाठी राज्य सरकारची संमती आधीच पाठवण्यात आली असल्याने, सीबीआयने तात्काळ या तपासाची सूत्रे हाती घेऊन दोषी अधिकाऱ्यांचीही चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number