Crime News : निर्माणाधीन इमारतीत रील बनवणं जीवावर बेतलं; सुरक्षारक्षकाने चोर समजून झाडली गोळी, तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

चोर समजून सुरक्षा रक्षकाने हे कृत्य केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. 9 ऑगस्ट रोजी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात तीव्र खळबळ उडाली.

Crime News : निर्माणाधीन इमारतीत रील बनवणं जीवावर बेतलं; सुरक्षारक्षकाने चोर समजून झाडली गोळी, तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Crime News : उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये सोशल मीडियासाठी 'रील' बनवणे एका तरुणाच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. साहिबाबाद येथील 'पार्श्वनाथ' या बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या संकुलात रील बनवण्यासाठी गेलेल्या समीर नावाच्या तरुणाची सुरक्षा रक्षकाने गोळ्या झाडून हत्या केली. चोर समजून सुरक्षा रक्षकाने हे कृत्य केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. 9 ऑगस्ट रोजी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात तीव्र खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपी सुरक्षा रक्षकाला तत्काळ अटक केली आहे.

चेतावणीकडे दुर्लक्ष अन् हवेत झाडलेली गोळी बेतली जीवावर

साहिबाबाद पोलिसांच्या माहितीनुसार, समीर 9 ऑगस्टच्या दुपारी आपल्या दोन साथीदारांसह बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी पोहोचला होता. त्या ठिकाणी लोखंडी सळ्या आणि इतर मौल्यवान साहित्य ठेवलेले होते. तैनात असलेल्या विवेक यादव या सुरक्षा रक्षकाने त्यांना आत येण्यापासून वारंवार रोखण्याचा प्रयत्न केला आणि चेतावणी दिली. मात्र, तरुणांनी त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. रक्षकाच्या दाव्यानुसार, त्याने तरुणांना घाबरवण्यासाठी हवेत गोळी झाडली होती, परंतु ती थेट समीरच्या छातीत लागली. गोळी लागताच समीरचा साथीदार घाबरून पळून गेला, तर गंभीर जखमी झालेल्या समीरला तातडीने एमएमजी (MMG) रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

हेही वाचा – Workplace Harassment: धक्कादायक! ऑफिसमधील वाढत्या मानसिक छळाला कंटाळून महिलेनं स्वतःला संपवलं

सुरक्षा रक्षक ताब्यात; परवानाधारक शस्त्र जप्त

घटनेची माहिती मिळताच साहिबाबादचे एसीपी अमित सक्सेना यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला. पोलिसांनी आरोपी सुरक्षा रक्षक विवेक यादव याला ताब्यात घेतले असून त्याचे परवानाधारक 'सिंगल-बॅरल' शस्त्र जप्त केले आहे. गोळी खरोखरच हवेत झाडली होती की थेट समीरवर डागली गेली, याचा शोध घेण्यासाठी पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. मृत समीर हा त्याच्या कुटुंबातील दोन भावांपैकी धाकटा होता. मृतदेहाचे शवविच्छेदन केले जात असून, पीडित कुटुंबाने दिलेल्या तक्रारीवरून संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number