तेलंगणामधील संगारेड्डी जिल्ह्यातील 27 वर्षीय कोमाटी सृजना हिचा एका हॉलेटमध्ये कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पण, ज्या कारणासाठी तरुणी हॉलेटमध्ये आली होती आणि ज्यानं तिला बोलावलं होतं, ते समोर येताच सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.
मुलीशी संपर्क तुटला, कुटुंबीय पोलिसात
मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणी एका वैद्यकीय महाविद्यालयात बालरोगशास्त्र विषयात पदव्युत्त शिक्षण घेत होती. यापूर्वी तिने एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले होते. आपल्या मुलीशी संपर्क होत नसल्याने सृजनाच्या कुटुंबीयांनी घाबरुन पोलिसांत धाव घेतली होती. त्यानंतर पोलिसांनी तिचा तपास लावण्यासाठी पहिल्यांदा तिचे मोबाईल लोकेशन ट्रेस केले, तेव्हा ते हैदराबादच्या मियापूर भागातील एका हॉटेलचे निघाले. त्यानंतर पोलिस घटनास्थळी गेली असता, तेव्हा तिचा मृतदेह हा हॉटेलमधील एका खोलीत कुजलेल्या अवस्थेत आढळून आला.
हेही वाचा-तिच्या प्रेमाची अशी परतफेड! पत्नीला मारहाण करत केलं असं काही…; अख्खं गावं रडलं
मित्राने बोलावून घेतलं अन् दुसऱ्या दिवशी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सृजना ही बुधवारी,30 सप्टेंबर रोजी हैदराबाद येथे आली होती. जिथं तिच्या एका मित्राने तिला सोन्याची चैन परत करण्याच्या बहाण्याने बोलण्यासाठी बोलावून घेतले. सृजना त्याच दिवशी संबंधित हॉटेलमध्ये त्या मित्राला भेटायला ही गेली. तिच्या मित्राने गुरुवारी अर्थात 1 ऑक्टोबर रोजी त्या हॉटेलमधून चेक आऊट केले होते. तेव्हा पासून तो फरार झाला आहे. सृजनाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरुन मियापूर पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
प्राथमिक तपासणी केली असता, सृजनाच्या शरीरावर कोणत्याही स्पष्ट जखमा आढळून आल्या नाहीत. त्यामुळे मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी सृजना मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलीस सध्या घटनास्थळावरील तसेत परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आहे. एवढेच नाही तर पोलीस सध्या संबंधित फरार झालेल्या मित्राचा शोध घेत आहे. मुलीच्या मृत्यूमागे तिच्याच मित्राचाच हात असावा,असा संशय सृजनाच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला असून या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.