Dharashiv Crime : "पैसे परत दे, नाहीतर…" अल्पवयीन मुलाचं अपहरण करत आईला फोनवरून धमकी; धाराशिवमध्ये धक्कादायक प्रकार

धाराशिवमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ऊसतोडीच्या उचलीच्या पैशांवरून अल्पवयीन मुलाचे अपहरण करण्यात आले आहे.

Dharashiv Crime : &quotपैसे परत दे, नाहीतर…&quot अल्पवयीन मुलाचं अपहरण करत आईला फोनवरून धमकी; धाराशिवमध्ये धक्कादायक प्रकार

धाराशिवमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ऊसतोडीच्या उचलीच्या पैशांवरून अल्पवयीन मुलाचे अपहरण करण्यात आले आहे. यादरम्यान मुकादमासह बीड जिल्ह्यातील चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहेय या धक्कादायक घटनेने धाराशिवमध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितनुसार, धाराशिव तालुक्यातील पळसप येथे 4 जुलै रोजी 35 वर्षीय कौशल्या सुनील काळे यांचा 16 वर्षीय मुलगा सचिन सुनील काळे हा घरात असताना आरोपींनी त्याला अपहरण करून नेले. “ऊसाच्या उचलीचे पैसे परत दे, नाहीतर कामावर ये” असा तगादा लावत मुलाला मारहाण करून बळजबरीने पळवून नेल्याचा आरोप मुलाच्या आईने केला आहे.

हेही वाचा- Delhi Jantar-Mantar Students Viral Video : भररस्त्यात घेरलं, धर्म विचारला, शिवीगाळ केली…, राष्ट्रीय हिंदू सेनेच्या अध्यक्षांकडून विद्यार्थ्यांना मारहाण; राऊतांच्या ट्वीटने खळबळ

अपहरणानंतर आरोपींनी मुलाच्या आईला फोन करून “पैसे दे आणि मुलाला घेऊन जा, नाहीतर मुलाला सोडणार नाही”, अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी स्वप्निल पारेकर या मुकादमासह बीड जिल्ह्यातील दिलीप गोविंद काळे, मच्छिंद्र गोविंद काळे आणि अर्चनाबाई दिलीप काळे या चौघांविरोधात ढोकी पोलिस ठाण्यात अपहरणासह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऊसतोड मजुरांच्या उचलीच्या पैशांवरून अल्पवयीन मुलाचे अपहरण झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number