2 वर्षांच्या मुलीसमोर पतीचा आक्रोश, पत्नीच्या शोधासाठी धावपळ; अखेर तपासात पतीबाबतच समोर आलं धक्कादायक गूढ!

Shocking Incident : कुटुंबीयही महिलेचा शोध लवकर घेण्यासाठी धावपळ करत होते. मात्र, तपास पुढे सरकरत असतानाच पतीबाबतच अशी माहिती समोर आली, ज्याने महिलेच्या कुटुंबीयांसह संपूर्ण गाव हादरवून सोडलं.

2 वर्षांच्या मुलीसमोर पतीचा आक्रोश, पत्नीच्या शोधासाठी धावपळ; अखेर तपासात पतीबाबतच समोर आलं धक्कादायक गूढ!
पत्नी बेपत्ता, पतीनेच हत्या केल्याचा आरोप

पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार पतीनेच पोलिसांता नोंदवली. तिच्या आठवणीत तो घरच्यांसमोर अक्षरश:ढसाढसा रडला. समोर होती अवघ्या 2 वर्षांची चिमुकली तर कुटुंबीयही महिलेचा शोध लवकर घेण्यासाठी धावपळ करत होते. मात्र, तपास पुढे सरकरत असतानाच पतीबाबतच अशी माहिती समोर आली, ज्याने महिलेच्या कुटुंबीयांसह संपूर्ण गाव हादरवून सोडलं. नेमकं काय घडलं होतं? पत्नीच्या बेपत्ता होण्यामागचं गूढ काय होतं?या संपूर्ण प्रकरणाबाबत सविस्तर घटनाक्रम जाणून घ्या.

सुखी संसारात अचानक काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला चांदनी आणि आरोपी पती 32 वर्षीय लोकेन्द्र यांचे लग्न 2022 मध्ये झाले असून चांदनी आग्रा जिल्ह्यातील सिंकदरा परिसरातील अकबरा गावची रहिवासी होती.या जोडप्याला अवघ्या 2 वर्षांची मुलगी आहे.

हेही वाचा-स्कूल बॅगमध्ये पुस्तकं नाही तर चक्क कोयता! शाळकरी मुलांच्या कारनाम्याने अहिल्यानगरमध्ये खळबळ

घटना लपवण्यासाठी आखला ‘असा’ डाव
लोकेन्द्र आणि चांदनी यांच्यात घटनेदिवशी घरगुती कारणांवर वाद झाले होते. संतापाच्या भरातच लोकेन्द्रने चांदनीची हत्या केली. त्यानंतर घराच्या मागील बाजूस जात त्याने तिचा मृतदेह जाळून ही टालका. धक्कादायक म्हणजे, चांदनीचा मृतदेह जाळल्यानंतर तिच्या शरीराची उरलेली हाडे ही त्याने गोळा केली आणि ती यमुना नदीत फेकली. स्वत:वर संशय जाऊन नये म्हणून लोकेन्द्रने त्याा मोबाईल अत्यंत हुशारीने बंद करत घरातच ठेवला, तर चांदनीचा मोबाईल हा सिंकदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत फेकला.

पतीबाबत धक्कादायक खुलासा
लोकेन्द्रने पत्नीची हत्या करत स्वत:वर कोणताही संशय येऊ नये म्हणून तो पोलीस ठाण्यात गेला आणि पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. याच दरम्यान, चांदनीचा भाऊ मनोज यानेही पोलीस ठाण्यात जात बहिणीच्या बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. एवढेच नाही तर चांदनीच्या भावाने लोकेन्द्र आणि सासरच्या मंडळींवर अनेक आरोप केले होते. ज्यामध्ये लोकेन्द्र हा चांदनीला वारंवार मारहाण करत होता.

हेही वाचा-2 वर्षे वारंवार अत्याचार, अश्लील फोटो मुलाला-पतीला पाठवले; धर्मांतरासाठी दबाव…; सांगलीत धक्कादायक घटना

अखेर असा लागला तपास
पोलीसांनी तक्रार दाखल करता तातडीने चांदनीचा तपास सुरु केला. त्याच वेळी चांदनीची आणि लोकेन्द्रची मुलगी ही एका दुकानाबाहेर खेळताना दिसून आली. शिवाय लोकेन्द्रचे घर आणि परिसरातील परिस्थिती पोलीसांनी पाहिली असता, त्यांना काही तरी संशयास्पद वाटले. त्यानंतर घटनास्थळी फॉरेन्सिक पथकाला बोलावण्यात आले आणि सर्व संबंधित पुराव्यांची तपासणी केली गेली.

पोलिसांनी अखेर लोकेन्द्रसा ताब्यात घेत त्याची चौकशी सुरु केली. साधारण बुधवारी केलेल्या चौकशीत त्यांनेच पत्नी चांदनीची हत्या केल्याची कबुली पोलिसांनी दिली. ज्यात त्याने, घरगुती कारणावरुच तिची हत्या करत मृतदेह घराच्या मागे जात जाळला आणि पुरावे नष्ट करण्यासाठी हाडे नदीत फेकली. पोलिसांनी संबंधित नदीकाठावरुन चांदनीच्या मृतदेहाचे अवशेष आणि तिचा मोबाईल फोन ही जप्त केला.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number