Pimpri Chinchwad: कर्जाच्या तणावातून टोकाचं पाऊल? पिंपरी-चिंचवडमध्ये आईसह दोन मुलांचे मृतदेह आढळल्याने खळबळ

पिंपरी-चिंचवडमधील ताथवडे येथे आई आणि दोन मुलांचे मृतदेह घरात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. आर्थिक तणावातून हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Pimpri Chinchwad: कर्जाच्या तणावातून टोकाचं पाऊल? पिंपरी-चिंचवडमध्ये आईसह दोन मुलांचे मृतदेह आढळल्याने खळबळ

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड शहरातील ताथवडे परिसरात एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली असून, एका घरात आई आणि तिच्या दोन मुलांचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमागे आर्थिक विवंचना कारणीभूत असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.मृतांमध्ये कल्पना बिपिन सूर्यवंशी (वय 35), शुभश्री बिपिन सूर्यवंशी (वय 17) आणि दादू बिपिन सूर्यवंशी (वय 10) यांचा समावेश आहे. तिघांचे मृतदेह त्यांच्या राहत्या घरात आढळून आले. या घटनेची माहिती मिळताच वाकड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

प्राथमिक तपासात, कल्पना सूर्यवंशी यांनी सकाळी इडली-सांबार तयार केले होते. या अन्नामध्ये विषारी पदार्थ मिसळण्यात आला असावा आणि त्यानंतर तिघांनी ते सेवन केले असावे, असा प्राथमिक अंदाज तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. या घटनेनंतर घरातच तिघांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.पोलिसांनी तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी वायसीएम रुग्णालयात पाठवले आहेत. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

हेही वाचा: Kalyan Crime: कल्याण हादरलं! 5 वर्षीय चिमुरडीवर 55 वर्षीय नराधमाकडून अत्याचार; 'टोमॅटो देतो' असं सांगून…

दरम्यान, या प्रकरणात आर्थिक अडचणींचा मुद्दा समोर आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्पना सूर्यवंशी यांनी घर खरेदीसाठी एका बँकेकडून कर्ज घेतले होते. मात्र, काही काळापासून आर्थिक परिस्थिती बिघडल्याने त्या कर्जाचे हप्ते नियमित भरता आले नव्हते.कर्जाचे हप्ते थकल्याने संबंधित बँकेने काही दिवसांपूर्वी घर जप्ती आणि लिलावाबाबत नोटीस पाठवली होती. या नोटीसमुळे त्या मानसिक तणावाखाली होत्या, अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी पोलिसांना दिली आहे.

घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून, स्थानिक नागरिकांनीही हळहळ व्यक्त केली आहे. आर्थिक तणाव आणि कौटुंबिक अडचणींमुळे ही घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात असला तरी, पोलिस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.सध्या वाकड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. शवविच्छेदन अहवाल आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे या प्रकरणातील नेमकी परिस्थिती स्पष्ट होणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number