मुंबईत खळबळ! ‘रामायण’च्या सेटवर अचानक आगीचा भडका; आगीचं कारण…

दमदार स्टारकास्ट असलेला, दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या बहुचर्चित ‘रामायण’ चित्रपट्याच्या सेटवर आग लागल्याची बातमी समोर आली आहे.
मुंबईत खळबळ! ‘रामायण’च्या सेटवर अचानक आगीचा भडका; आगीचं कारण…
Ramayana Set Fire

दमदार स्टारकास्ट असलेला, दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या बहुचर्चित ‘रामायण’ चित्रपट्याच्या सेटवर आग लागल्याची बातमी समोर आली आहे. मुंबईतील गोरेगाव फिल्म सिटीमध्ये चित्रपटाच्या सेटवर आग लागल्याची दुर्घटना घडली. फिल्म सिटीतील प्राइम फोकस स्टुडिओच्या मागील बाजूस रिलायन्स मीडिया वर्क्सजवळ उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या सेटमधील PCR युनिटला आग लागली. सुमारे 100 बाय 20 फूट क्षेत्रात ही आग पसरली होती.

बीएमसी अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. सायंकाळी 4 वाजून 55 मिनिटांनी आग पूर्णपणे विझवण्यात आली. विद्युत वायरिंग, इलेक्ट्रिक इन्स्टॉलेशन, केबल्स, दरवाजे, लाकडी फळ्या, एसी युनिट्स, बांबू, प्लास्टिक साहित्य, साऊंड सिस्टिम आणि शूटिंगचे साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.

हेही वाचा – तमाशाचा नाद, कर्जाचा डोंगर अन् सोन्याची लालसा! माजी सरपंचासह वृद्ध महिलेच्या हत्येचं गूढ पोलिसांनी उकललं

या दुर्घटनेनंतर ‘रामायण’ चित्रपटाचे आजचे शूटिंग थांबवण्यात आले आहे. पोलीस तपास सुरू असून PCR मधील तांत्रिक बिघाडामुळे आग लागण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

अद्याप रामायण – भाग 1 या चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असताना ही चिंताजनक बातमी समोर आली. मात्र 6 नोव्हेंबरला दिवाळीच्या सुट्यांमध्ये प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचा क्रेझ हा सर्वत्र पाहायला मिळतोय. तसेच रामायण भाग 2 येणार असल्याचे याआधी सांगण्यात आले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version